पोलीस वारंट न्युज नेटवर्क : १५ एप्रिल
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेल्या शिका, संघटीत व्हा व संघर्ष करा या तत्त्वांचे काटेकोरपणे पालन केल्यास कोणीही आपली सर्वागीण प्रगती करू शकतो. त्यांच्या परखड विचारांची आज खऱ्या अर्थाने समाजाला गरज असून आजच्या तरूणांनी त्यांच्या विचारांचा अवलंब करून आपली प्रगती करावी असे मत भाजपा नेते रविंद्र सुरवसे यांनी व्यक्त केले.
जामखेड तालुक्यातील खर्डा येथील धम्मसागर बुध्द विहार, भिमनगर येथे जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी कर्जत-जामखेड विधानसभाक्षेत्र प्रमुख रवींद्र सुरवसे , मा. पंचायत समिती सदस्य विजयसिंह गोलेकर, सरपंच आसाराम गोपाळघरे, गटशिक्षणाधिकारी कैलास खैरे, ग्रामविकास अधिकारी प्रशांत सातपुते,पत्रकार श्वेता गायकवाड ,दत्तराज पवार, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश गोलेकर, दीपक जावळे ,वैजिनाथ पाटील, गणेश शिंदे, मदन पाटील,वैभव जमकावळे ,सोपान गोपाळघरे ,कपिल लोंढे , सुनील लोंढे, भिमा घोडेराव, भिमसैनिक जयंतीचे अध्यक्ष प्रशांत कांबळे , आशुतोष गायकवाड , दिपक जावळे ,परमेश्वर बोराडे ,दादा जावळे ,मिलिंद साळवे, भिमा घोडेराव ,निखिल पगारे ,प्रकाश जावळे ,आनंद साळवे ,शुभम पगारे ,आकाश जावळे, राकेश कांबळे ,नितीन जावळे ,पोपट पगारे ,विकास कांबळे, बालाजी समुद्रे, विशाल गायकवाड, विठ्ठल धनवे
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण त्यांना अभिवादन करण्यात आले. तर व विविध मान्यवरांनी आपापल्या मनोगतातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार सांगीतले.
No comments:
Post a Comment