पोलीस वारंट न्युज नेटवर्क : १५ एप्रिल
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेल्या शिका या तत्त्वास अनुसरून खर्डा येथील मागसवर्गीय मुलामुलींच्या व्यवसायिक शिक्षणासाठी ग्रामपंचायत निधीतून २ टक्के मदत करण्याचा ठराव खर्डा ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात आला असून लवकरच अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन खर्डा गावचे कार्यकुशल सरपंच आसाराम गोपाळघरे यांनी केले.
जामखेड तालुक्यातील खर्डा ग्रामपंचायतच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालयात काल दि. १४ एप्रिल रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण अभिवादन करण्यात आले. यावेळी सरपंच आसाराम गोपाळघरे, ग्रामविकास अधिकारी प्रशांत सातपुते,उपसरपंच श्रीकांत लोखंडे , संपादिका श्वेता गायकवाड , ग्रामपंच्यायत सदस्य प्रकाश गोलेकर, दीपक जावळे, सोपान गोपाळघरे, महालिंग कोरे , गणेश शिंदे , वैजिनाथ पाटील , मदन गोलेकर,विकास शिंदे ,सामजिक कार्यकर्ते भीमराव घोडेराव आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सरपंच आसाराम गोपळघरे , ग्रामविकास अधिकार प्रशांत सातपुते , उपसरपंच श्रीकांत लोखंडे, पत्रकार श्वेता गायकवाड, भीमराव घोडेराव, सोपान गोपाळघरे,महालिंग कोरे विविध मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली.
No comments:
Post a Comment