पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-१२ एप्रिल
जामखेड तालुक्यातील खर्डा येथे आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त खर्डा पोलीस स्टेशनच्या वतीने शांतता कमिटी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते .
यावेळी उपस्थित भीमजयंतीचे अध्यक्ष प्रशांत कांबळे, पत्रकार आशुतोष गायकवाड, संतोष थोरात ग्रा.सदस्य दीपक जावळे, भीमा घोडेराव ,निखिल पगारे, परमेश्वर बोराडे, दादा जावळे, प्रकाश जावळे,राकेश कांबळे ,मिलिंद साळवे,आनंद साळवे, नितीन जावळे,पोपट पगारे, शुभम पगारे,विकास कांबळे ,नितीन जावळे,आकाश जावळे, बालाजी समुद्रे, विकास कांबळे मोठ्या संख्येने भिमसैनिक उपस्थितीत होते
यावेळी देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन न करणाऱ्या व कायदा सुव्यवस्था चे नियम मोडणाऱ्या विरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही यावेळी सह्ययक पोलीस निरीक्षक महेश जानकर यांनी दिला
यावेळी दिलेल्या मार्गदर्शक सूचना
१) मिरवणूक ही दिलेल्या वेळेत तसेच दिलेल्या मार्ग प्रमाणे व कायदेशीर नियमात पार पाडावी
२) वाहतुकीस कोणत्याही प्रकारे अडथळा होणार नाही याची दक्षता घ्यावी
३) वादग्रस्त गाणी किंवा वादग्रस्त विधान कोणी करणार नाही व त्यामुळे कोणाच्याही धार्मिक भावना दुखावून कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही
No comments:
Post a Comment