पोलीस वारंट न्यूज नेटवर्क ११ एप्रिल
जामखेड शहरात महामानव डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त समाजमंदिर बाजारतळ येथे सार्वजनिक भिमजयंती महोत्सव समिती व समस्त भिमसैनिक जामखेड तालुका यांच्या वतीने महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध ख्यातनाम गायक मिलिंदजी शिंदे यांचा भिमगितांचा क्रांतीकारी जलसा मोठ्या उत्साहात पार पडला कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते विकीभाऊ सदाफुले,नगराध्यक्ष निखिल घायतडक यांनी केले होते.
सायंकाळी ७.०० वाजता सुप्रसिद्ध ख्यातनाम गायक मिलिंदजी शिंदे यांचे आगमन झाले. याप्रसंगी भारतरत्न डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे विधानसभा प्रमुख प्रा.मधुकर राळेभात व भाजपाचे नगरसेवक अमित चिंतामणी यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले तसेच मिलिंद शिंदे यांचा सार्वजनिक भिमजयंती महोत्सव समितीच्या वतीने अध्यक्ष राजन समिंदर सर, उपाध्यक्ष रवी सोनवणे,सचिव रजनीकांत मेघडंबर,सल्लागार सिध्दार्थ साळवे,डाॅ.सचिन घायतडक, सचिन सदाफुले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी क्रांतीकारी जलसा कार्यक्रमात तहसिलदार योगेश चंद्रे, पोलीस निरीक्षक महेश पाटील, विस्तार अधिकारी बापूराव माने, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे नेते प्रा.मधुकर राळेभात,आरपीआय चे जिल्हा अध्यक्ष सुनिल साळवे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे शहराध्यक्ष राजेंद्र गोरे,मुकुंदराज सातपूते,जिल्हा सोसायटी अहमदनगर संचालिका ज्योतीताई पवार,निवासी शाळेच्या मुख्याध्यापिका शोभाताई कांबळे,महानूर सर,
माजी प्राचार्य अनंता खेत्रे सर,व्यापारी रमेश जरे,संचालक सागर सदाफुले,जामखेड कर्मचारी कृती समिति चे अध्यक्ष युवराज पाटील,प्रथमनगराध्यक्ष विकास राळेभात,नगरसेवक अमित चिंतामणी,सुरेखा सदाफुले, सुरेखाताई रत्नाकर सदाफुले, सुनिल जावळे सर,बौध्दाचार्य गोकुळ गायकवाड,सचिन सदाफुले,वंचित बहुजन आघाडी चे तालुका अध्यक्ष अतिश पारवे, विनोद सोनवणे सर, प्रताप पवार सर,नितीन वाव्हळ,बापूसाहेब गायकवाड, मुकूंद घायतडक,प्रकाश काळे,रजनीकांत साखरे सर,जयदिप शिंदे,प्रा.राहुल आहिरे सर,माजी सरपंच भरत आहेर,शिवाजी ससाणे,विनोद घायतडक,आदी भिमजयंती महोत्सव समिती चे पदाधिकारी, माहिला, बाळगोपाळ व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सार्वजनिक भिमजयंती महोत्सव समितीचे पदाधिकारी व आदी भिमसैनिकांनी परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment