पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-११एप्रिल
जामखेड तालुक्यातील खर्डा प्राथमिक आरोग्य केंद्राची तब्बल ६ कोटी रूपये खर्च करून निर्माण केलेली व पंचक्रोशीतील २० पेक्षा जास्त गावांच्या आरोग्यासाठी लाभदायी ठरणार इमारत मागील अनेक महिन्यांपासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत होती. या इमारतीचे उद्घाटन होऊन येथून आरोग्याच्या सुविधा कधी मिळतील असा प्रश्न या परिसरातील जनतेतून विचारला जात होता. या पार्श्वभूमीवर आज दि. ११ एप्रिल रोजी खर्डा ग्रामपंचायतचे सरपंच व माजी पंचायत समिती सदस्य विजयसिंह गोलेकर, सदस्य व ग्रामस्थ आदी मान्यवरांच्या उपस्थितीत खर्डा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे प्रतिकात्मक स्वरूपात उद्घाटन करण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा संघटक विजयसिंह गोलेकर, सरपंच आसाराम गोपळघरे, माजी सरपंच संजय गोपाळघरे, उपसरपंच श्रीकांत लोखंडे, सेवा सोसायटीचे चेअरमन मुकुंद गोलेकर, व्हाईस चेअरमन शिवाजी भोसले, ग्रामपंचायत सदस्य महालिंग कोरे, अशोक खटावकर, दिपक जावळे, सोसायटीचे संचालक चंद्रकांत गोलेकर, कल्याण सुरवसे, दत्ता भोसले, कपिल लोंढे, राहुल कातोरे, मोहन लोखंडे, तुकाराम शिंदे, बन्सी ढेरे, बाबा चौधार, पप्पू काळे, तात्या होडशीळ, परमेश्वर इंगळे आदी मान्यवर उपस्थित होते..
यावेळी विविध मान्यवरांची आपापली मनोगत व्यक्त केली. यावेळी बोलताना माजी पंचायत समिती व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा संघटक विजयसिंह गोलेकर म्हणाले की, आजच्या वाढत्या महागाईच्या काळात गोरगरीबांना खाजगी दवाखान्यामध्ये आरोग्य सुविधा घेणे परवडत नसल्याने अनेक रूग्णांना व त्यांच्या नातेवाईकांनी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्या पार्श्वभूमीवर गोरगरीबांना शासकीय रुग्णालयात सुविधा मिळाव्यात यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा सरकारी रूग्णालयास प्राधान्य दिले जात आहे. मात्र खर्डा याठिकाणी भव्य इमारत उभी असूनही या सुविधा मिळत नव्हत्या. त्यामुळे आज या इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. या ईमारतीचे उदघाटन पालकमंत्री ,असतील किंवा आरोग्य मंत्री यांच्या हस्ते करण्याचा आग्रह धरल्यामुळे. सगळ्या सोयीसुविधां नागरिकांना देता येत नव्हत्या. आज दि. ११ एप्रिल रोजी ग्रामपंचायत पदाधिकारी, सहकारी सोसायटी चेअरमन या सर्वांच्या उपस्थितीत या प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रतीकात्मक उद्घाटन करण्यात आले आहे. तसेच या ठिकाणी असलेले वैद्यकीय अधिकारी यांनाही नागरिकांना
या इमारतीतून सेवा द्यावी अशी विनंती करण्यात आली आहे
खऱ्या अर्थाने खर्ड्यात पोलीस स्टेशन, वखार गोडाऊन, पाणीपुरवठा योजना, या तीन्ही कामांची सुरुवात कुठल्याही उद्घाटनाची फार्स न करता करण्यात आली होती. त्याच पार्श्वभूमीवर खर्डा प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्घाटन लवकर होणे अपेक्षित होते. पण ते होऊ शकले नाही. म्हणून आज या इमारतीचे या प्रकारे उद्घाटन करण्यात आल्याचेही विजयसिंह गोलेकर यांनी सांगितले.
यावेळी सरपंच आसाराम गोपाळघरे, माजी सरपंच संजय गोपाळघरे, उपसरपंच श्रीकांत लोखंडे, चेअरमन चंद्रकांत गोलेकर व ग्रा.प. सदस्य महालिंग कोरे आदी मान्यवरांनीही आपली मनोगते व्यक्त केली.
No comments:
Post a Comment