पोलीस वारंट न्यूज नेटवर्क -१० एप्रिल
शासनाने कांदा अनुदानासाठी लावलेली इ-पिकपेरा अट रद्द करून तालाठ्यांमार्फत हस्तलिखित लावलेल्या नोंदी स्विकाराव्यात तसेच बाजार समितीच्या आवाराबाहेरील लायसन्स धारक व्यापाऱ्यांच्याही कांदा पट्ट्या स्विकारून शेतकऱ्यांना सरसकट कांदा अनुदान द्यावे. सरकारने कांदा लागवडीमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ येऊ देऊ नये. असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत जामखेड विधानसभा क्षेत्र अध्यक्ष प्रा. मधुकर राळेभात यांनी केले.
जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीकडून कांदा विक्रीच्या पट्ट्या व अहवाल मिळण्याबाबत मोठ्या प्रमाणात टाळाटाळ होत आहे. त्यामुळे तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी शासकीय नियमानुसार कांदा अनुदान मिळण्यापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जामखेड तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्याचा आला. हा शेतकऱ्यांचा मोर्चा पंचायत समिती समोरून काढण्यात येऊन तहसील कार्यालयासमोर या मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत जामखेड विधानसभा क्षेत्र अध्यक्ष प्रा. मधुकर आबा, तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे, माजी सभापती सुर्यकांत मोरे, जामखेड शहराध्यक्ष राजेंद्र गोरे, माजी नगराध्यक्ष विकास राळेभात, माजी जिल्हा परिषद सदस्य बबन तुपेरे, प्रदिप शेटे, प्रकाश सदाफुले, मंगेश आजबे, बापूसाहेब शिंदे, अमित जाधव, हनुमंत पाटील, मनोज भोरे, भिमराव लेंडे, सुंदरदास बिरंगळ, बबन देवकाते, प्रसन्न कात्रजकर, विजय पवार आदींसह तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे म्हणाले की, आपल्या शेतकऱ्यांचे कैवारी असलेल्या आ. रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा मोर्चा होत आहे. शासनाने कांदा अनुदानासाठी लावलेल्या जाचक अटी रद्द करून इ-पिकपेरा नोंदी बरोबर तालाठ्यांमार्फत लावलेल्या हस्तलिखित नोंदीही ग्राह्य धरून सर्वांना सरसकट अनुदान द्यावे. बाजार समिती बाहेरील परवाना धारक व्यापाऱ्यांच्याही खरेदी पावत्या ग्राह्य धराव्यात. शेतकऱ्यांबाबत कोणत्याही प्रकारचा अन्याय सहन केला जाणार नाही. कांदा अनुदानाबाबत जाचक अटी रद्द न केल्यास यापुढे तिव्र अंदोलन केले जाईल. तसेच शेतकऱ्यांचनीही एकजूटीने राहुन आपल्यासाठी होणाऱ्या अंदोलनात सहभागी झाले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा शेतकऱ्यांचा पक्ष असून तो खंबीरपणे उभा राहिल असेही प्रतिपादन दत्तात्रय वारे यांनी यावेळी केले.
यावेळी राष्ट्रवादीचे नेते व पंचायत समितीचे माजी सभापती सुर्यकांत मोरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नगर जिल्हाध्यक्ष सुनील लोंढे, प्रसन्न कात्रजकर, विजय पवार, भिमराव लेंडे, सरपंच निलेश पवार, नरेंद्र जाधव मंगेश आजबे आदी मान्यवरांचीही भाषणे झाली.
यावेळी पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व उपनिरीक्षक अनिलराव भारती यांच्या उपस्थितीत चोख बंदोबस्त ठेवला.
No comments:
Post a Comment