पोलीस वारंट न्यूज नेटवर्क : ७ एप्रिल
जामखेड तालुक्यातील खर्डा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खर्डा (मुली) या शाळेतील इयत्ता दुसरीत शिकणारी विद्यार्थीनी हिंदवी चंद्रकांत अरण्ये हिने मंथन राज्यस्तरीय सामान्यज्ञान स्पर्धा परीक्षेत १५० पैकी १४८ गुण मिळवून राज्य गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांक मिळवला आहे.
हिंदवी ही आदर्श शिक्षक चंद्रकांत अरण्ये यांची कन्या आहे. तीच्या या ने दैदीप्यमान यशाबद्दल तिचे मुख्याध्यापक बाबुराव गीते, वर्गशिक्षक सुवर्णा माणेकर व शाळेतील सर्व शिक्षक यांच्यासह सरपंच आसाराम गोपाळघरे, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष गोलेकर,जामखेड तालुक्याचे गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, गटशिक्षणाधिकारी कैलास खैरे,विस्तार अधिकारी सुरेश कुंभार,खर्डा केंद्राचे केंद्रप्रमुख राम निकम, सोनेगाव केंद्राचे केंद्रप्रमुख मुकुंदराज सातपुते, खर्डा ग्रामस्थ यांच्यासह सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.
No comments:
Post a Comment