पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-७ एप्रिल
जागतिक आरोग्य दिनानिमित्त ७ ते १४ एप्रिल या कालावधीत "सुंदर माझा दवाखाना" स्वच्छता अभियान सर्व आरोग्य संस्थांमध्ये राबविण्यात येत आहे.या अभियानात डॉक्टर,आरोग्य कर्मचारी सहभागी होत आहेत.स्थानिक लोकप्रतिनिधी, स्वयंसेवक,सामाजिक संस्थांनीही सहभागी होऊन अभियान यशस्वी करावे आणि संस्था बळकटीकरणास मदत करावी असे आवाहन ग्रामीण रुग्णालय'चे वैद्यकीय अधीक्षक डॉ.शशांक वाघमारे यांनी केले.सुंदर माझा दवाखाना अभियाना उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.यावेळी रुग्ण कल्याण समितीचे आमदार नियुक्त सदस्य रमेश दादा आजबे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सुनील बोराडे,डॉ.किशोर बोराडे,
स्नेहालय जिल्हा समन्वयक तथा उडान बालविवाह प्रतिबंध अभियानाचे योगेश अब्दुले,स्नेहज्योत प्रकल्पाचे मजहर खान,डेटा एन्ट्री अधिकारी मोहित कदम उपस्थित होते.
पुढे बोलतांना डॉ.वाघमारे म्हणाले की;जागतिक आरोग्य दिनानिमित्त सर्वांसाठी समान आरोग्य सुविधा,सर्वांसाठी आरोग्य असे घोषवाक्य असून जगभरात आरोग्याशी संबंधित गैरसमज दूर करणे हे उद्दिष्ट आहे.यासोबतच विविध आरोग्यविषयक धोरणे तयार करण्यास आणि त्यांची योग्य अंमलबजावणी करण्यास प्रवृत्त केले जाते.सरकारी रुग्णालये आणि आरोग्य संस्थेत सर्वांना समान सुविधा उपलब्ध आहेत.लोकांनी सार्वजनिक रुग्णालयांच्या सुविधांचा वापर केला पाहिजे,याविषयी जनजागृती करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे जागतिक आरोग्य दिनानिमित्त "सुंदर माझा दवाखाना" हा उपक्रम राज्यासह जामखेड शहरात राबविण्यात येत आहे.आरोग्य संस्थांमध्ये दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी स्वच्छता दिवस पाळला जातो.हा दिवस नियमित राबविण्यात येणार असून,आरोग्य संस्थांच्या भोवतालचा परिसर,सर्व विभाग, स्वच्छतागृहे,भांडारगृहे इत्यादींची अधिक स्वच्छता राखण्यात यावी.अभियाना च्या निमित्ताने आरोग्य संस्थांच्या आवारात व दर्शनी भागात सुशोभीकरण करण्यात आले आहे.स्वच्छता दिनाचा कार्यक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे असेही डॉ.वाघमारे म्हणाले.या अभियानास रुग्ण कल्याण समितीचे रमेश दादा आजाबे यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या.
या अभियानाप्रारंभ प्रसंगी ग्रामीण रुग्णालयातील नेत्ररोग चिकित्सक डॉ.स्वाती गायकवाड,
या अभियानाप्रारंभ प्रसंगी ग्रामीण रुग्णालयातील नेत्ररोग चिकित्सक डॉ.स्वाती गायकवाड,
अधिपरिचरिका सारिका माळी,समुपदेशक सुप्रिया कांबळे,अधिपरिचरिका सविता शिंदे,एक्सरे विभागाचे राहुल वासकर,लॅब टेक्निशियन श्याम जाधव,गणेश वाघमारे,टीबी विभागाचे अरुण घुंगरट,दादासाहेब खाडे,महेश मोहळकर,डॉ.गंडाळ उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीतेसाठी सचिन दादा बेग,उषा घायतडक,उगले मावशी,हृषीकेश उगले यांनी विशेष परिश्रम घेतले.सूत्रसंचालन योगेश अब्दुले यांनी केले तर आभार डॉ.किशोर बोराडे यांनी मानले.
No comments:
Post a Comment