पोलीस वारंट न्युज नेटवर्क : ९ मे
जामखेड तालुक्यातील बांधखडक गावाकडे जाण्यासाठी करण्यात आलेल्या बांधखडक फाटा ते बांधखडक या २ किलोमीटर होत असलेल्या रस्त्याचे काम हे अतिशय निकृष्ट दर्जाचे होत असून सदर रस्त्यावर खडी व कच हि जास्त प्रमाणात वापरले आहे मात्र त्या प्रमाणात डांबर खुप कमी वापलेले जात आहे. त्यामुळे सदर कच व खडी उचकटून अस्ताव्यस्त होत आहे.
रस्त्याचे काम पुर्ण होण्या अगोदरच रस्ता खराब होत असल्याचे दिसून येत आहे. सदर काम दर्जेदार होत नसल्यामुळे बाबत ठेकेदार यांना विचारणा केली असता. ठेकेदार भाषा करत, वरीष्ठ अधिकाऱ्यांना टक्केवारी दयावी लागते त्यामुळे सदर काम हे अशाच स्वरुपाचे होणार अशी उडवाउडवीची उत्तरे देऊन अरेरावीची भाषा करत आहे.
बांधखडक फाटा ते बांधखडक हा रस्ता खुप महत्वाचा असून हे काम हे निकृष्ट झाल्यास शासनाचा सर्व पैसा हा वाया जाण्याबरोबरच रस्त्यावरून जाणारे शेतकरी, विद्यार्थी व नागरिकांच्या त्रासात वाढच होणार आहे. तसेच आपण किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत तपासणी करूनच सदर कामाचे बील अदा करण्यात करावे. अशी मागणी बांधखडकचे सरपंच राजेंद्र भिमा कुटे, उपसरपंच तान्हाजी खंडेराव फुंदे व ग्रामस्थांनी केली आहे.
याबाबतची रितसर तक्रार (निवेदन) सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता (अहमदनगर) व उपअभियंता जामखेड यांना देण्यात आले आहे.
चौकट
तसेच सदर ठेकेदाराकडून काम काढून घेऊन इतर ठेकेदाराकडून रस्त्याचे काम करावे. तसेच अश्या मुजोर ठेकेदारावर योग्य कारवाई करावी अशीही मागणी सरपंच राजेंद्र भिमा कुटे, उपसरपंच तान्हाजी खंडेराव फुंदे व ग्रामस्थांमधून होताना दिसत आहे.
No comments:
Post a Comment