पोलीस वारंट न्युज नेटवर्क : दि. ९ मे
जामखेड तालुक्यातील रत्नापूर येथील रत्नदीप मेडिकल कॉलेज येथे बी.फार्म.सी. प्रथम वर्षाचे शिक्षण घेणाऱ्या पुणे जिल्ह्य़ातील १९ वर्षीय फिर्यादी पिडीता या रत्नदीप मेडीकल फौंन्डेशन ॲण्ड रिसर्च सेंटर रत्नापुर कॉलेज, रत्नापुर येथे बी.फार्म.सी.प्रथम वर्ग येथे शिक्षण घेत असताना २१ फेब्रुवारी २०२३ पासून ते एप्रिल २०२३ दरम्यान वेळोवेळी केलेल्या विनयभंग प्रकरणी डाॅ. भास्कर भाऊराव मोरे याचे विरुध्द गु.र.नं. व कलम 187/2023भादवि कलम 354, 354 (अ), 509 प्रमाणे विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी आरोपी असलेल्या डाॅ. भास्कर मोरेवर कठोर कारवाई करावी यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने जामखेड शहरातील खर्डा चौक व तहसिल कार्यालयावर तिव्र निदर्शने करण्यात आली.
यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी तिव्र निषेध व्यक्त करत " भास्कर मोरे हाय हाय, नराधम भास्कर मोरेला शिक्षा झालीच पाहिजे, भास्कर मोरेचे करायचे काय" भास्कर मोरे तुम एक काम करो, खुर्ची छोडो और जेल मे आराम करो " अश्या घोषणांनी खर्डा चौक व तहसील कार्यालय परिसर दणाणून सोडला.
दरम्यान काल दि. ८ मे रोजी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी सदर पिडित विद्यार्थींनी समवेत जामखेड येथे पत्रकार परिषदेत घेतली. यावेळी मुलीचे पालकही उपस्थित होते. यावेळी रत्नदीप मेडिकल फौंडेशन या संस्थेचे संस्थापक डॉ. भास्कर मोरे या निच माणसाने जे माझ्या बरोबर लाजिरवाणे कृत्य केले आहे. त्या संदर्भात मी जामखेड पोलीस स्टेशनला फिर्याद दिली असून त्यानुसार त्याच्यावर गुन्हाही दाखल झालेला आहे. त्यांनी मला न्याय द्या. आतापर्यंत ज्या विद्यार्थ्यांनीं संदर्भात डॉ. मोरेने असे कृत्य केले आहे. त्यामुलींनीही तक्रार देण्यासाठी समोर यावे. तुमच्या मदतीसाठी पोलीस तयार आहेत. तरी सर्वांनी समोर येऊन तक्रार द्यावी असे आवाहन करते. या नंतर कॉलेजमध्ये चालणाऱ्या अनेक गैर प्रकाराबबत पिडीतेने सांगितले की, मुलींना वर्गांचे प्रमुख बनवून व आपल्या कॅबीनमध्ये बोलावून त्यांच्याशी लाजिरवाणे प्रकार केले जातात. गरीब विद्यार्थ्यांकडून फिच्या नावावर अव्वाच्या सव्वा पैसे उकळले जातात अश्या प्रकारांविरूध्द काही तक्रार केल्यास नापास करण्याची धमक दिली जाते. अश्या निच माणसावर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे अशीही अपेक्षा सदर पिडीतेने या पत्रकार परिषदेत व्यक्त केली. तसेच या संस्थेत चालणाऱ्या ईतर गैरप्रकारांबाबतही पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली.
यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते ओंकार मकदूम म्हणाले की, डाॅ. भास्कर मोरेंने केलेल्या विनयभंगाच्या गैरप्रकारांबाबत एकाच पिडीतेने जरी तक्रार दाखल केली असली तरी असे अनेक प्रकार घडले आहेत. सदर मुलीच्या संदर्भात पोलीस कारवाई बाबत योग्य ती कारवाई सुरू असून इतर अन्याय ग्रस्तांनीही तक्रार देण्यासाठी समोर आले पाहिजे त्यांचे बरोबर पोलीस प्रशासनाबरोबरच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदही असून नराधम डॉ. भास्कर मोरेला कठोरात कठोर कारवाई होई पर्यंत अंदोलन करेल. तसेच राज्य कुठेही विद्यार्थींवर अन्याय होत असेल तरी आम्ही त्याच्याबरोबर आहोत असेही सुतोवाच ओंकार मकदूम यांनी यावेळी केले.
डाॅ. मोरेचा निषेध व कारवाईसाठी केलेल्या अंदोलनानंतर तहसिलदार योगेश चंद्रे यांना रितसर निवेदन देण्यात आले. यावेळी कारवाई बाबत वरिष्ठांकळवण्या बरोबर सदर प्रकरणी अन्याय ग्रस्त मुलींना योग्य न्याय देण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासनही तहसिलदार योगेश चंद्रे यांनी अंदोलनकर्त्यांना दिले.
चौकट...
रत्नदीप मेडीकल फौंन्डेशन ॲण्ड रिसर्च सेंटर रत्नापुर कॉलेज येथे यापुर्वी असे व इतर अनेक प्रकार घडलेले असण्याची शक्यता आहे पण आपले शैक्षणिक करिअर उध्वस्त होऊ नये म्हणून अनेक पिडीत विद्यार्थ्यीनी फिर्याद देण्यासाठी पुढे येत नाहीत. असे दिसून येते आहे. जर अश्या प्रकारे आणखी कोणाबाबत गैरप्रकार घडला असल्यास न घाबरता त्यांनी गुन्हे दाखल करण्यासाठी पुढे यावे. पोलीस विभागाकडून त्यांना योग्य न्याय देण्यात येईल असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा