पोलीस वारंट न्यूज नेटवर्क -२जून
शासनाने जाहीर केलेले अनुदान मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी ७/१२ उताऱ्यावरील पिक पेऱ्याची नोंद, तलाठी / ग्रामसेवक व कृषि सहाय्यक या त्रिसदस्यीय समितीचा पहाणी अहवाल बाजार समितीस तात्काळ सादर करावे. छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजार समिती, जामखेडचे सभापती पै. शरद कार्ले यांनी केले आहे.
या बाबत दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान मिळण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ३५० रूपयांचे अनुदान जाहीर केले आहे. मात्र काही शेतकऱ्यांना हे अनुदान मिळण्यासाठी काही तांत्रिक अडचणी येत होत्या. त्या पार्श्वभूमीवर दि.१ फेब्रुवारी ते ३१ मार्च २०२३ या दोन महिन्याच्या कालावधीमधील अनुदान मिळावे यासाठी अनेक कांदा उत्पादक शेतकरी बांधवांनी जामखेड बाजार समितीस अर्ज सादर केले होते. सदर शेतकऱ्यांनी शेतक-यांनी ७/१२ उताऱ्यावरील पिक पेरा व शासकीय अधिकाऱ्यांचा संयुक्त पहाणी अहवाल तात्काळ कृषि उत्पन्न बाजार समिती जामखेडच्या कार्यालयात सादर करावेत. जेणे करुन शेतकऱ्यांना कांदा अनुदान मिळणे सुलभ होईल. असे आहवान कृषि उत्पन्न बाजार समिती जामखेडचे सभापती पै. शरद पंडीत कार्ले यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment