पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-४ जून
नांदेड तालुक्यातील बोंढार हवेली येथील दलित तरुण अक्षय भालेराव हत्या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी व पीडित कुटुंबाला सरकारने तात्काळ आर्थिक मदत जाहीर करावी. अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे.
राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरयांनी संविधानाच्या माध्यमातून सर्वांना न्याय, समता, बंधुता, विश्वास, अभिव्यक्ती असा जगण्याचा मार्ग दाखवला आणि त्याच बाबासाहेबांची जयंती निमित्त मिरवणूक का ? काढली म्हणून बोंढार हवेली गावात गुरुवारी लग्नाच्या वरातीत हातात तलवारी व लाठ्या-काठ्या घेऊन नाचत होते.आकाश राहुल भालेराव व अक्षय श्रावण भालेराव हे दोघे भाऊ दुकानावर वस्तू खरेदी करत असताना सायंकाळी साडेसातच्या सुमारास संजय तिडके याने गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मिरवणूक का ? काढली असे म्हणत तुम्हाला जीव मारुन टाकतो अशी धमकी देत त्याच्यासह सात ते आठ जणांनी भालेराव बंधूंना मारहाण सुरू केली .अक्षय भालेराव यांचे हातपाय धरून पोटावर खंजीरने वार करून त्याला जागीस ठार केले. तसेच अक्षयचे आई भाऊ व अन्य नातेवाईकांना हल्ला करून गंभीर जखमी केले.
अक्षय भालेराव या तरुणाचा जातीयवादी विचारांच्या गुंडांनी केलेल्या खून महाराष्ट्राच्या पुरोगामी मुखवट्याला काळीमा फासणारा आहे. दोषींवर ॲट्रॉसिटी, हत्येचा कट या सह इतर कलमनुसार कठोर कारवाई करावी. यासाठी आज दि. ४ जून रोजी जामखेड येथिल पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक महेश पाटील यांना याबाबत निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनाव्दारे ही मागणी करण्यात आली असून, निवेदनात म्हटले आहे की, गुरुवारी दि.१ जून रोजी रात्री अक्षय भालेराव (वय 32) या दलित तरुणाची हत्या करण्यात आली आहे. या घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी व पीडित कुटुंबाला सरकारने तात्काळ आर्थिक मदत जाहीर करावी तसेच दोषींची मालमत्ता जप्त करण्यात यावी म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निवेदन देण्यात आले.
यावेळी वंचित बहुजन आघाडी नेते ॲड. डॉ. अरुण (आबा) जाधव, बापू ओहोळ (प्रवक्ते लोकअधिकार आंदोलन), योगेश सदाफुले (जि. उप-अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी), विशाल पवार, वैजीनाथ केसकर, सचिन भिंगारदिवे, गणेश घायतडक, मच्छिंद्र जाधव, संतोष चव्हाण, तुषार शिरोळे, राजू शिंदे, अतुल ढोणे, दिनेश ओहोळ, अरुण चव्हाण, भीमा काळे उपस्थित होते.
No comments:
Post a Comment