पोलीस वारंट न्यूज नेटवर्क- १० जून
जामखेड तालुक्यातील खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली खर्डा व परिसरातील औषधी विक्रेत्यांची खर्डा पोलीस स्टेशन येथे बैठक घेतली या बैठकीमध्ये त्यांनी सर्व (औषध विक्रेते )मेडिकल दुकानदार यांनी आपल्या दुकानामध्ये सीसीटीव्ही बसवण्याचे आवाहन केले.
तसेच पुढे मार्गदर्शन करताना महेश जानकर म्हणाले शिर्डी हैदराबाद राज्य महामार्गावर ऐतिहासिक वारसा असलेल्या व व्यापार दृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या खर्डा शहरात औषध विक्रेते हे मोठ्या प्रमाणात असून ते एक व्यापार पेठेचा महत्त्वाचा घटक आहेत. व्यापारात गुन्हेगारीची दहशत नसल्यास व्यापार पेठ चांगली नावाजलेले होऊन भरभराटीची, प्रगतशील होऊन गावाच्या विकासात हातभार लागतो .आपण सुशिक्षित, सुसंस्कृत व आरोग्य रक्षक एक सामाजिक आरोग्य दूत आहात. आपण आपल्या मेडिकल दुकान मध्ये सीटीव्ही उपक्रम राबवल्यास आधुनिक व्यापार पेठ होण्यास मदत होईल, गुन्हेगारी रोखण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करताना मोक्याच्या ठिकाणी सीसीटीव्ही बसवल्यास त्याचा उपयोग होणार आहे. पोलीस मित्र म्हणून आपलाही उपयोग होईल.
यावेळी खर्डा मेडिकल असोसिएशनचे अशोक हराळ ,संतोष थोरात, बबन कोथमिरे ,प्रकाश वायभासे, ओंकार पारगावकर, किरण वाघमारे, अवतार कोरे, लक्ष्मण गीते ,विकास बेलेकर, किशोर गाताडे, विकास जायभाय, राजेश लटपटे, सोहेल शेख, निखिल ढाळे, बालाजी होडशिळ, विलास भोसले ,बालाजी गीते, गुरुदत्त साबळे आदी (मेडिकल) औषध विक्रेते उपस्थित होते. बैठकीचे सूत्रसंचालन पोलीस हेडकॉन्स्टेबल शशिकांत मस्के यांनी तर आभार शिवतेज मेडिकल संचालक संतोष थोरात यांनी व्यक्त केले.
No comments:
Post a Comment