जामखेड :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ९ वर्षांच्या कार्यकाळात देशाचा चेहरा मोहरा बदलण्याचे काम केले - आ. प्रा. राम शिंदे - police warrant kharda

police warrant kharda

संपादिका -श्वेता बापूसाहेब गायकवाड-9970529697 / कार्यकारी संपादक- आशुतोष गायकवाड- 8888785253,

🚨 पोलिस वॉरंट न्यूजवर आपले सहर्ष स्वागत आहे 🚨 ताज्या घडामोडी | स्थानिक व राष्ट्रीय बातम्या | शैक्षणिक माहिती | सामाजिक प्रश्न आपल्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा... धन्यवाद 🙏

  • Home
  • शिक्षण
  • राजकीय
  • रक्तदान
  • ठळक बातम्या
  • जामखेड शहर
  • खर्डा शहर
  • कर्जत-जामखेड
  • आरोग्य

Breaking

सोमवार, १९ जून, २०२३

Home राजकीय बातम्या जामखेड :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ९ वर्षांच्या कार्यकाळात देशाचा चेहरा मोहरा बदलण्याचे काम केले - आ. प्रा. राम शिंदे

जामखेड :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ९ वर्षांच्या कार्यकाळात देशाचा चेहरा मोहरा बदलण्याचे काम केले - आ. प्रा. राम शिंदे

सोमवार, जून १९, २०२३ राजकीय बातम्या,

पोलीस वारंट न्युज नेटवर्क : १९ जून 
    देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोरगरीबांच्या कल्याणासह सर्वच घटकांच्या प्रगतीसाठी भरीव काम केले आहे. या पुर्वीच्या पंतप्रधानापेक्षा हे नक्कीच सरस काम आहे. तसेच मी सुद्धा विधानपरिषदेचा आमदार झाल्यानंतर एक वर्षांच्या काळात 
विविध विकासकामांसाठी २०० कोटी रुपयांचा निधी आणला आहे. तसेच यामुळे मतदारसंघात भाजपासाठी चांगले वातावरण निर्माण होत असून कर्जत व जामखेड बाजार समित्यांसह अनेक ग्रामपंचायतीं भाजपाच्या ताब्यात आल्या आहेत. असे प्रतिपादन करण्याबरोबर कार्यकर्त्यांनी केंद्रसरकारच्या योजनांची माहिती घराघरात पोहचवावी असेही आवाहन आ. राम शिंदे यांनी केले. 
    आपल्या ९ वर्षांच्या कार्यकाळात देशातील गोरगरिबांच्या कल्याणासाठी काम करणारे व देशाच्या इतिहासात सर्वांत ऐतिहासिक निर्णय घेणारे आणि सर्वांसाठी आदर्श ठरलेले नेतृत्व नरेंद्र मोदी यांचे आहे. त्यांनी गोरगरिबांसाठी विविध योजना राबवल्या. त्याचा फायदा जनतेला होत आहे,’’ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने नऊ वर्ष यशस्वी पुर्ण केली या निमित्ताने महाजनसंपर्क अभियानांतर्गत काल दि. १८ जून रोजी प्रा. राम शिंदे यांनी जामखेड येथे पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. 

यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष अजय काशिद, कर्जत-जामखेड विधानसभा प्रमुख रवी सुरवसे, पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. भगवान मुरूमकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शरद कार्ले, शहराध्यक्ष बिभीषण धनवडे, पांडुरंग उबाळे, सलीम बागवान, नगरसेवक अमित चिंतामणी, ज्ञानेश्वर झेंडे, बाजार समीती संचालक संचालक सचिन घुमरे, विष्णू भोंडवे, जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ पाचारणे, ॲड. प्रविण सानप, प्रविण चोरडिया, अर्जुन म्हेत्रे, ऋषिकेश मोरे, उद्धव हुलगंडे, तुषार बोथरा यांच्या सह मोठ्या संख्येने भाजपा पदाधिकारी उपस्थित होते. 

गोरगरीब जनतेला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक योजना राबवत यशस्वी केल्या 

पीएम किसान सन्मान निधी योजना

२०१४ मध्ये मोदी यांनी पहिल्यांदा केंद्राची सूत्र हाती घेतल्यानंतर २४ फेब्रुवारी २०१९ रोजी त्यांनी शेतकऱ्यांना आकर्षित करणारी अशी पीएम किसान सन्मान निधी योजना जाहीर केली. शेतकर्‍यांना फायदा होणे हा या योजनेचा उद्देश. या योजनेनुसार प्रत्येक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दरवर्षी ६.००० रुपये जमा करण्यात येते. दोन दोन हजार रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये ती शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केली जाते.

मोदी सरकारने आतापर्यंत या योजनेचे 12 हप्ते दिले आहेत. या योजनेचा लाभ कुटुंबातील पती, पत्नी आणि अल्पवयीन मुलांनाच घेता येतो. डिसेंबर ते मार्च 22 दरम्यान सरकारने 11 कोटी 11 लाख 96,895 लोकांना पैसे दिले. मात्र, या योजनेतही अनेकांनी आपले हात धुवून घेतले. त्यामुळे केंद्र सरकारने आता शेतकऱ्यांची वर्गवारी करण्याचा निर्णय घेतला आहे.

जन धन योजना

15 ऑगस्ट 2014 रोजी पंतप्रधान मोदी यांनी एक मोठा निर्णय घेतला. देशातील प्रत्येक कुटुंबाला बँकिंग व्यवस्थेशी जोडण्याची मोहिम त्यांनी सुरु केली. हीच ती जन धन योजना. मोदी यांची ही योजना पूर्णतः यशस्वी ठरली. 2022 मध्ये जन धन योजना अंतर्गत देशात 45 कोटींहून अधिक बँक खाती उघडण्यात आली. हा आकडा आता 48.99 कोटी इतका झाला.

प्रधानमंत्री उज्ज्वला योजना

मोदी सरकारच्या सर्वाधिक चर्चेत असलेल्या योजनांपैकी प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आहे. गरीब महिलांना मोफत एलपीजी गॅस कनेक्शन या योजनेअंतर्गत दिले जाते. 1 मे रोजी 2016 मध्ये ही योजना सुरू केली. सुरवातीला 1.5 कोटी कनेक्शन देण्याची योजना होती. पण, या योजनेचा प्रतिसाद इतका उदंड की ती संख्या 2.2 कोटी इतकी पोहोचली. वंचित कुटुंबांना 8 कोटी एलपीजी कनेक्शन देण्याचे उद्दिष्ट मार्च 2020 पर्यंत ठेवण्यात आले होते पण प्रत्यक्षात ते 7 सप्टेंबर 2019 रोजीच पूर्ण झाले.

पंतप्रधान गरीब कल्याण योजना

26 मार्च 2020 रोजी कोरोना काळात लॉकडाऊनमध्ये ही योजना सुरु करण्यात आली. कोरोनामुळे लॉकडाऊन परिस्थितीत गरीब, आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि मध्यमवर्गीय लोकांना मोफत रेशन देण्याची ही योजना होती. सुरुवातीला एप्रिल ते जून 2020 या कालावधीसाठी सुरू करण्यात आलेली ही योजना पुढे 30 सप्टेंबर 2022 पर्यंत वाढविण्यात आली. सुमारे 80 कोटी लोकांनी या योजनेचा लाभ घेतला. या योजनेसाठी मोदी सरकारने सुमारे ५.९१ लाख कोटी रुपये खर्च केले.

आयुष्मान भारत योजना

2018 मध्ये केंद्रीय अर्थसंकल्पातून आयुष्मान भारत योजनेची घोषणा करण्यात आली. एक लाख आरोग्य केंद्रे उभारून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना वार्षिक 5 लाख रुपयांच्या आरोग्य विमा संरक्षणासह जोडणे अशी ही योजना. 10 कोटींहून अधिक कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

हर घर जल योजना

2020 – 21 च्या अर्थसंकल्पात मोदी सरकारने हर घर जल योजनेची घोषणा केली. देशातील सर्व घरांमध्ये शुद्ध पाणी पुरवठा करण्याची ही योजना. 2024 पर्यंत ही योजना पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. सुमारे 3.5 लाख कोटी रुपयांची हि योजना आहे. यामुळे लोकांना पाण्यासाठी दूर जाण्याची गरज भासणार नाही.

चौकट
आमदार प्रा राम शिंदे यांनी आमदारकीच्या एका वर्षात दोनशे कोटी रुपये आणले आहेत यामुळे रस्ते, वीज पाणी या अनेक ठिकाणी असणाऱ्या समस्या सुटल्या तसेच जामखेड शहराला पाणीपुरवठा करणारी अडीचशे कोटी रुपयांची योजना अंतिम टप्प्यात आली आहे. लवकरच टेंडर प्रकिया सुरू होईल. 

चौकट
विरोधकांना पराभव पचवता येत नाही माझा पराभव झाला व आमदार रोहित पवार विजयी झाले त्यावेळी मी माझ्या घरी बोलावून त्यांचा सत्कार केला पण मी आमदार झाल्यावर आमदार रोहित पवार यांनी साधे अभिनंदन देखील केले नाही. त्यांना सलग तीन पराभवाचे धक्के बसले म्हणून ते मतदारसंघात दडपशाही वातावरण निर्माण करत आहेत.

* प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत ८० कोटी लोकांना मोफत रेशन वाटप

* प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ३ कोटी गरीब कुटुंबांना कायमस्वरूपी घरे मिळाली
• ११. ८ कोटी घरांपर्यंत पोहोचले नळाचे पाणी आणि 100% घरांमध्ये वीज पोहोचली
* ४८.३ कोटी जन धन खाती उघडून गरिबांना बँकिग प्रणालीमध्ये समावून घेतले

सशक्त शेतकरी, समृद्ध भारत प्रधानमंत्री किसान योजनेअंतर्गत १२ कोटी शेतकऱ्यांना वार्षिक ६.००० रुपयांची आर्थिक मदत

• प्रधानमंत्री फसल विमा योजने अंतर्गत स्थापना ३७.५ कोटी शेतकऱ्यांची नोंदणी

• MSP मध्ये ऐतिहासिक वाढ (खर्चापेक्षा ५० टक्के अधिक MSP) आणि २०१३-१४ ते २०२२-२३ पर्यंत कृषी बजेटमध्ये ५.६ पट वाढ

• किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत ४ कोटी शेतकऱ्यांना मिळाले ४.७ लाख कोटी रुपये चे कर्ज

• प्रधानमंत्री कृषी सिचाई योजनेंतर्गत ५७ लाख शेतकऱ्यांना लाभ झाला

आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गासाठी नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्थांमध्ये १० टक्के आरक्षण सुनिश्चित केले गेले. 

प्रधानमंत्री स्वानिधी योजनेअंतर्गत ३४ लाख पथारी विक्रेत्यांना कर्ज वाटप

भारतातील अमृत पिढी

सक्षम बनते

१३९० नवीन विद्यापीठे, ७ नवीन IIT आणि ७ नवीन IIM ची स्थापना

• १५ AllMS आणि २२५ वैद्यकीय महाविद्यालयांची

• प्रधानमंत्री श्री योजनेंतर्गत १४.५०० शाळांचा विकास

प्रधानमंत्री कौशल विकास योजनेअंतर्गत १.३७ कोटी युवक प्रशिक्षित

• देशात लाख स्टार्टअप्स आणि १००+ यूनिकॉर्न

रोजगार मेळावे अंतर्गत ७१.००० हून अधिक नियुक्ती पत्रांचे वितरण

नाटी तू नारायणी : महिला सक्षमीकरण

निरोगी जीवन प्रत्येकाचा हक्क

* भारतात प्रथमच प्रत्येक १.००० पुरुषांमागे १.०२० महिला

●  प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत ९.६ कोटी एलपीजी कनेक्शन देण्यात आले
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ११.७२ कोटी शौचालये बांधणे
स्टैंड अप इंडियाच्या लाभाथ्यपैिकी ८१ टक्के महिला आहेत

प्रधानमंत्री मुद्रा योजने अंतर्गत २७.६ कोटी महिला लाभार्थ्यांना मिळाले कर्ज

प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेअंतर्गत

३.०३ कोटी महिलांना मदत

* २६ आठवडे मशुल्क प्रसूती रजा मध्यमवर्गीय जीवन सोपे झाले

७ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर संपूर्ण कर सवलत

* मेट्रो सुविधा २० शहरांमध्ये पोहोचली

UDAN योजनेमुळे १.१६ कोटी लोकांना स्वस्त हवाई प्रवासाचा लाभ घेता आला आहे

१००+ स्मार्ट शहरांमध्ये ७८०० प्रकल्पांची अंमलबजावणी

• एप्रिल 2022 मध्ये GST अंतर्गत आतापर्यंतचे सर्वाधिक 21.87 लाख कोटींचे मासिक कर संकलन

आयुष्मान भारत अंतर्गत 10.7 कोटी कुटुंबांना आरोग्य विमा संरक्षण आणि

4.5 कोटी लोकांना मोफत उपचार मिळाले * 9,300 हून अधिक जन औषधी केंद्रांवर

स्वस्त औषधे उपलब्ध आहेत • वैद्यकीय पायाभूत सुविधांच्या

बळकटीकरणासाठी 264,180 कोटींची तरतूद

1.59 लाखांहून अधिक आयुष्मान भारत आरोग्य आणि निरोगीपणा केंद्रे

जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेअंतर्गत 220 कोटींहून अधिक कोविड लसीचे डोस देण्यात आले

मिशन इंद्रधनुष अंतर्गत 5.65 कोटींहून अधिक माता आणि बालकांना लस संरक्षण मिळाले आहे

सक्षम भारत

आज भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी आणि 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे

'कोरोनाच्या काळात वंदे भारत मिशन अंतर्गत 2.97 कोटी भारतीयांचे परत येणे सुनिश्चित केले आणि युक्रेन आणि येमेनमधून 27,000 हून अधिक भारतीयांची सुटकाही करण्यात आली

• भारताची सुरक्षा मजबूत झाली, 2014 पासून कोणत्याही मोठ्या शहरात (संघर्ष क्षेत्र वगळता) एकही मोठा दहशतवादी हल्ला झालेला नाही

* कलम 370 हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यांमध्ये घट झाली आहे.

"वसुधैव कुटुंबकम" या थीमवर भारताने G-20 शिखर परिषदेचे 2023 चे अध्यक्षपद स्वीकारले

* डिजिटल व्यवहारात भारत जगात पहिल्या क्रमांकावर आहे


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने ९

पायाभूत सुविधांचा अभूतपूर्व विकास
*पीएम गति शक्ती मास्टर प्लॅनची स्थापना
* 2014 पासून वाहतूक आणि महामार्ग बजेटमध्ये 500% वाढ
राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामाचा वेग 208% वाढून दररोज 12 किमीवरून 37 किमी प्रतिदिन झाला आहे.
* जागतिक दर्जाची वंदे भारत ट्रेन सुरू झाली आगामी काळात एकूण 400 बांधण्यात येतील
*विमानतळांची संख्या दुप्पट 74 वरून 148 वर
ईशान्येकडील राज्यांचा ऐतिहासिक विकास
*आसाममधील सर्वात लांब बोगीबील पुलाचे बांधकाम आणि सुबनसिटी लोअर येथे 2,000 मेगावॅटचा जलविद्युत प्रकल्प
*आदिवासी आसाम शांतता करार आणि बोडो नागा, कार्बी शांतता कराराने ईशान्येत शांतता प्रस्थापित केली
*ईशान्येकडील राज्यांमध्ये अतिरेकी घटनांमध्ये 76% घट

सांस्कृतिक वारसाचे नवीन युग

अयोध्येतील श्री रामजन्मभूमी मंदिर आणि काशी विश्वनाथ आणि उज्जैन महाकाल मंदिरात भव्य कॉरिडॉरचे बांधकाम

सोमनाथ आणि केदारनाथ मंदिराचा जीर्णोद्धार

• आदिवासी स्वाभिमान दिन आणि आदिवासी स्वातंत्र्यसैनिकांना समर्पित 10 आदिवासी संग्रहालये

• सर्वोच्च बलिदान देणाऱ्या आपल्या सैनिकांसाठी नवी दिल्लीत राष्ट्रीय युद्ध
अशा अनेक योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांसाठी आणल्या आहेत.  

आ. राम शिंदे यांनी विधानपरिषदचे आमदार झाल्यानंतर मंजूर केलेली कामे 

*मुख्यमंत्री सडक योजना रिसर्च अँड डेव्हलपमेंट टप्पा क्रमांक दोन 20 किलोमीटरच्या अकरा रस्त्यांसाठी 15 कोटी रुपये 
*मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा क्रमांक दोन 20 किलोमीटरच्या 18 कोटी 73 अक्षर रुपये
* मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा क्रमांक दोन 13 किलोमीटरच्या चार रस्त्यांसाठी बारा कोटी चाळीस लाख रुपये 
*मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा क्रमांक दोन 21 किलोमीटरच्या चार रस्त्यांसाठी वीस कोटी रुपये *महाराष्ट्र राज्य अर्थसंकल्प मुख्य लेखाशीर्ष अंतर्गत रस्त्यांसाठी 26 कोटी रुपये 
*महाराष्ट्र राज्य अर्थसंकल्प मुख्यालय का शिष्य अंतर्गत 23 किलोमीटरच्या नऊ रस्त्यांसाठी 24 कोटी रुपये 
*तांडा वस्ती विकास योजनेच्या विविध कामांची 25 गावांसाठी पाच कोटी रुपये 
*भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक योजनेअंतर्गत 16 गावांमध्ये सामाजिक भावनांसाठी चार कोटी रुपये 
*स्थानिक विकास निधीतून विविध विकास कामांनी साठी 28 गावांना दोन कोटी 14 लाख रुपये स्थानिक विकास सिंगल फेज थ्री फेज साठी 26 गावांसाठी एक कोटी ऐंशी लाख रुपये *स्थानिक विकास निधीतून 73 डिजिटल शाळेसाठी प्रोजेक्टर करिता एक कोटी रुपये विविध पर्यटन विभागामार्फत विविध कामांसाठी पाच कोटी रुपये
* 25 15 योजनेअंतर्गत 25 गावांसाठी पाच कोटी रुपये नगर विकास विभाग वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी *लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या नावाने शहरात पाच कोटी रुपयांच्या सभागृहासाठी तरतूद
* जामखेड शहराच्या पाणीपुरवठा योजनेसाठी सर्व प्रकारचे कामांना मिळून 250 कोटींची मंजुरी हे काम टेंडर प्रक्रियेत आहे
Tags # राजकीय बातम्या
  • Tweet
  • Share
  • Pin it
  • Comment
  • Whatsapp
Author Image

About Unknown

राजकीय बातम्या
Posted at सोमवार, जून १९, २०२३
यास ईमेल कराहेब्लॉगकरा!X वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा
Labels राजकीय बातम्या

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

नवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)
श्वेता बापूसाहेब गायकवाड संपादिका-सा.पोलीस वारंट मो नंबर-९९७०५२९६९७

श्वेता बापूसाहेब गायकवाड संपादिका-सा.पोलीस वारंट मो नंबर-९९७०५२९६९७

Blogger द्वारे प्रायोजित.

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क

संपादिका -श्वेता बापूसाहेब गायकवाड-9970529697 / कार्यकारी संपादक- आशुतोष गायकवाड- 8888785253,

Popular Posts

  • जामखेड तालुक्यातील १६ वर्षांच्या मुलीच्या बेपत्ता होण्याच्या प्रकरणाचा तपास; प्रेमीयुगुलीच्या आत्महत्येची घटना उघडकीस..पुण्यातील खडकवासला धरणाजवळ दोघांचे मृतदेह आढळले
    जामखेड प्रतिनधी/11जुलै2025 महादेव नगर, मांजरी येथील एका १६ वर्षीय मुलीच्या बेपत्ता होण्याच्या तक्रारीनंतर केलेल्या शोधात आज सक...
  • खर्डा येथे टेम्पोच्या चाकाखाली चिरडून चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू….खर्डा परिसरात हळहळ व्यक्त
    पोलीस वारंट न्यूज नेटवर्क/२५ जानेवारी घरासमोरील रस्त्यावर खेळत असलेल्या परी लखन गायकवाड रा .खर्डा या तीन वर्षीय चिमुकलीस पाण्याच...
  • ५ लाख रुपये दिले, सोने दिले. नवरदेवाने वरमाला गळ्यात टाकली अन् नवरी मात्र दुसऱ्याच दिवशी फरार, खर्डा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल
      पोलीस वारंट न्यूज नेटवर्क/१ फेब्रुवारी२०२५ लग्न कराव, सेटल व्हावं अशी अनक लोकांची इच्छा असते. काही जण प्रेमविवाह करतात, पण काह...
  • घरगुती वादात रागाच्या भरात पतीवर त्रिशूल उगारला.. कडेवरील मुलाच्या डोक्यात लागला ; चिमुकल्या मुलाचा मृत्यू
    अहिल्यानगर प्रतिनधी/११ जुलै२०२५ घरगुती वादातून अवाच्य अपघाताची कहाणी महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्याच्या आंबेगाव पुनर्वसन ...
  • बनावट दारू प्रकरणी छापा जामखेड रस्त्यावर ६ जण पकडून ३१ लाखाचा ऐवज जप्त
    पोलीस वारंट न्यूज नेटवर्क/२७डिसेंबर राज्य उत्पादन शुल्क, विभागीय भरारी पथक, पुणे विभाग, पुणे या कार्यालयाने अहिल्यानगर जिल्हयात ...
  • ब्रेकिंग न्यूज: खर्डा येथील आत्महत्या प्रकरण उघडकीस; कर्जाच्या वसुलीसंदर्भातील तणावामुळे व्यक्तीने घेतला गळफास, दोघांना अटक, एक आरोपी फरार
    खर्डा प्रतिनिधी/८ सप्टेंबर २०२५ खर्डा (ता. जामखेड) येथे कर्ज दिलेल्या पैशांची परतफेड न करताच उलट धमक्या दिल्याचा त्रास सहन न...
  • गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सराईत गुन्हेगार बबलू गोलेकर तडीपार
    खर्डा प्रतिनिधी / २७ ऑगस्ट २०२५ गणेशोत्सव आणि ईद ए मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर संभाव्य गोंधळ व कायदा सुव्यवस्थेचा भंग टाळण्यासाठ...
  • जामखेड हादरलं! सीएनजी गॅसचा स्फोट ! इर्टीगा कारमध्ये होरपळून जामखेड पोलीस कर्मचारी आणि व्यावसायिकाचा मृत्यू
    पोलीस वारंट न्यूज नेटवर्क/24 फेब्रुवारी 2025 अहिल्यानगरमधील जामखेडमध्ये आज पहाटे दुर्देवी घटना घडली आहे. कार डिव्हायडरला धडकल्या...
  • दोन चिमुकल्यांसह आईची विहिरीत उडी मारुन आत्महत्या; जामखेडमधील धक्कादायक घटना
    ( खर्डा प्रतिनिधी) :8 ऑगस्ट2025 जामखेड तालुक्यातील नायगाव येथे शुक्रवार सायंकाळी एक धक्कादायक घटना घडली. रूपाली नाना उगले ...
  • एसटी बसचे न येणे विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतलं, खाजगी वाहनातून प्रवास करताना टमटम पलटी, खर्डा विद्यालयातील १६ विद्यार्थी जखम, संतप्त पालकांनी खर्डा बसस्थानकाला ठोकले कुलूप
    पोलीस वारंट न्यूज नेटवर्क/२७ डिसेंबर जामखेड तालुक्यातील खर्डा बसस्थानकात शाळा सुटल्यानंतर जामखेड, ईट ही बस न आल्याने मुंगेवाडी व...

Popular Posts

धक्कादायक: “लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर वारंवार अत्याचार;मुलगी झाल्यावर आरोपीचा जबाबदारीला नकार ; खर्डा शहर हादरले” आरोपीविरुद्ध पोलिसात गंभीर गुन्हा दाखल

५ लाख रुपयांच्या बनावट नोकरी फसवणुकीचा खर्डा पोलिसांकडून पर्दाफाश;२ वर्षे फरार आरोपी मुरलीधर नेटके नवी मुंबईतून अटक

जामखेडमध्ये प्रतिष्ठित व्यावसायिकाच्या मुलाचा गळफास घेऊन आत्महत्या;आत्महत्येपूर्वी हाताची नस कापली, कानात हेडफोन सापडले;शहरात हळहळ, पोलिसांचा तपास सुरू

जामखेडचे ॲड. प्रविण ससाणे व ॲड. अजिनाथ जायभाय यांची जिल्हा परिषदेच्या लीगल हेड पॅनलवर निवड

जामखेड तालुक्यात अतिवृष्टीचा तडाका; चौंडी, देवकर वस्ती, आघीमध्ये मोठे नुकसान; नुकसानीच्या ठिकाणी सभापती प्रा.राम शिंदे यांनी केली प्रत्यक्ष पाहणी; मदतीसाठी प्रशासनाला तातडीचे आदेश

नागरिकांचा संताप उफाळला, जामखेडमध्ये आ. रोहित पवारांनी अधिकाऱ्यांना सुनावले, आ. रोहित पवार यांच्या उपस्थितीत जामखेडमध्ये आमसभा

आ. रोहित पवार घेणार कर्जत-जामखेड पंचायत समित्यांच्या वार्षिक आमसभाशासकीय कामकाज, विकासकामांचा आढावा आणि नियोजनाला मिळणार गती

कलाकेंद्र वादातून थेट तरुणावर धाडकन घातली गोळी; पुन्हामहाराष्ट्रात खळबळ!

मोठी बातमी: अवैध वसुलीचा व्हिडीओ व्हायरल; शेंडी बायपासवर ट्रकचालकांकडून पैसे घेताना पोलीस निलंबित

‘शिवपट्टण’ ब्रॅण्डचा राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर उदय;कालाघोडा फेस्टिव्हलमध्ये स्टॉल मिळणार – खर्डा ग्रामोद्योग संस्थेचा नवा प्रवास!

Labels

  • अरणगाव (2)
  • अहमदनगर (8)
  • अहमदनगर बातम्या (1)
  • अहमदनगर पोलीस (1)
  • अहमदनगर पोलीस स्टेशन (2)
  • अहमदनगर शहर (3)
  • अहिल्यानगर पोलीस (1)
  • आरोग्य (1)
  • आहिल्यानगर पोलीस (2)
  • आहिल्यानगर पोलीस स्टेशन (1)
  • आहिल्यानगर बातम्या (1)
  • कर्जत (2)
  • कर्जत -जामखेड (1)
  • कर्जत पोलीस स्टेशन (1)
  • कर्जत-जामखेड (24)
  • केज पोलीस स्टेशन (1)
  • क्राईम (18)
  • क्राईम न्यूज (1)
  • क्राईम बातम्या (111)
  • खर्डा (1)
  • खर्डा ग्रामपंचायत (1)
  • खर्डा पोलीस स्टेशन (125)
  • खर्डा प्रतिनधी (1)
  • खर्डा शहर (329)
  • खर्डा शहर ठळक (1)
  • चोंडी (2)
  • चौंडी (1)
  • जवळा (1)
  • जातेगाव (2)
  • जामखेड (3)
  • जामखेड ठळक (2)
  • जामखेड पोलीस स्टेशन (172)
  • जामखेड शहर (172)
  • जामखेड शहर बातम्या (1)
  • जिल्हाधिकारी बातम्या (1)
  • ठळक बातम्या (429)
  • डोणगाव बातम्या (1)
  • तेलंगशी बातम्या (1)
  • थळक बातम्या (1)
  • दिघोळ बातम्या (1)
  • दुःखद बातम्या (6)
  • धानोरा ग्रामपंचायत (1)
  • नगर (1)
  • नगर पोलीस स्टेशन (1)
  • नायगाव (2)
  • नेवासा पोलीस स्टेशन (11)
  • नेवासा बातम्या (2)
  • नेवासा शहर (2)
  • पर्यावरण (1)
  • पोलीस स्टेशन (1)
  • बांधखडक (2)
  • बांधखडक बातम्या (2)
  • बातम्या (8)
  • बावी (2)
  • बाळगव्हाण (3)
  • बीड क्राईम बातम्या (1)
  • बीड पोलीस स्टेशन (5)
  • बीड शहर (2)
  • भूम बातम्या (1)
  • मिरजगाव पोलीस स्टेशन (2)
  • मोहरी बातम्या (1)
  • रक्तदान (1)
  • राजकीय (86)
  • राजकीय ठळक (6)
  • राजकीय ठळक बातम्या (1)
  • राजकीय बातम्या (347)
  • लोणी ग्रामपंचायत (1)
  • शहर ठळक बातम्या (3)
  • शालेय (5)
  • शालेय बातम्या (1)
  • शिर्डी पोलीस स्टेशन (2)
  • शिर्डी बातम्या (1)
  • शिक्षण (1)
  • शैक्षणिक (2)
  • शैक्षणिक बातम्या (43)
  • साकत (6)
  • साकत बातम्या (1)
  • सातेफळ (1)
  • सामजिक बातम्या (27)
  • सामाजिक (23)
  • सामाजिक ठळक (1)
  • सामाजिक बातम्या (99)
  • सोनेगाव (7)
  • सोलापूर ठळक बातम्या (1)
  • स्थानिक गुन्हे शाखा (26)
  • स्थानिक गुन्हे शाखा नगर (1)
  • स्थानीक गुन्हे शाखा (2)
  • हळगाव (2)
  • dysp संतोष खाड़े (1)
  • Vote (1)

पोलीस वारंट समाजातील प्रत्येक घटकांच्या घडामोडी, कला आणि साहित्य क्षेत्रातील उत्तुंग भरारी, खेळ आणि क्रीडा विश्वातील यशस्वी दौड, शिक्षण व शैक्षणिक वाटचाल, राजकारण आणि सामाजिक माहिती, गुन्हेगार आणि समाजातील विकृती, जनजागृती आणि जनसामान्यांच्या भावना आपल्या लेख, कथा, काव्य, गोष्टी, व बातम्यांच्या माध्यमातून समाजापुढे मांडत असते.

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

POLICE WARRANT ©2023 All rights reserved Developed By DIGITAL FLY KHARDA

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *