पोलीस वारंट न्युज नेटवर्क : २० जून
खर्डा पोलीस हद्दीतील सातेफळ येथील चोरीच्या गुन्ह्यात चार वर्षांपासून फरार आरोपी लखन अनिरूद्र सदाफुले रा. सातेफळ यास अटक करण्याची चमकदार कामगिरी खर्डा पोलीसांनी केली आहे.
या बाबत सविस्तर असे की जामखेड पोलीस स्टेशन गुरंनं. 109/2019 भादवि कलम 379 प्रमाणे दाखल गुन्ह्यातील फिर्यादी शहाजी जगन्नाथ भोसले रा. सातेफळ यांची ५७० फुट तांब्याची तार चोरी झालेबाबत जामखेड पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती. त्यासंदर्भाने जामखेड पोलीस स्टेशनला आरोपी लखन अनिरूद्र सदाफुले रा. सातेफळ याचे विरुध्द २०१९ साली चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्याचे समजताच सदर आरोपी २०१९ साली फरार फरार झाला होता.
सदर ५ वर्षापासुन चोरीच्या गुन्ह्यामधील फरार असलेला आरोपी लखन अनिरूद्र सदाफुले हा सातेफळ गावच्या शिवारात आल्याची माहिती खर्डा पोलीस स्टेशनला मिळताच पोलीसांनी सापळा रचून आरोपी त्यास ताब्यात घेवून अटक करून कारवाई केली आहे.
सदरची कारवाई ही सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश जानकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक संभाजी शेंडे, पोलीस काॅन्स्टेबल शेषराव म्हस्के,बाळू खाडे व अशोक बडे यांनी केलेली आहे.
No comments:
Post a Comment