पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-८ जून
अगामी २०२४ च्या विधानसभा निवडणूकीची जय्यत तयारी भारतीय जनता पार्टीने हाती घेतली आहे.भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक प्रमुखांची घोषणा आज केली आहे. माजी मंत्री तथा आमदार प्रा.राम शिंदे यांच्या खांद्यावर पक्षाने पुन्हा एकदा मोठी जबाबदारी सोपवली आहे. आमदार प्रा.राम शिंदे यांची कर्जत-जामखेड मतदारसंघाच्या निवडणुक प्रमुखपदी पक्षाने निवड केली आहे.
अगामी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत राज्यात भाजपची पुन्हा सत्ता यावी यासाठी भाजपने जोरदार तयारी हाती घेतली आहे. पक्षाचं संघटन मजबूत करण्यासाठी भाजपने राज्यातील २२८ अनुभवी नेत्यांवर विधानसभा निवडणूक प्रमुखपदाची जबाबदारी सोपवली आहे. तशी घोषणा आज पक्षाकडून करण्यात आली आहे. यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुक प्रचार प्रमुखांची घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशाने आमदार राम शिंदे यांची २२७ कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील मतदारसंघ निहाय निवडणूक प्रचार प्रमुख खालील प्रमाणे :
२१६ - अकोले मतदारसंघ (ST) : वैभव पिचड
२१७ - संगमनेर मतदारसंघ - सतिश कानवडे
२१८ - शिर्डी मतदारसंघ - ॲड रघुनाथ बोठे
२१९- कोपरगाव मतदारसंघ - स्नेहलता कोल्हे
२२० - श्रीरामपूर मतदारसंघ (SC) - नितीन दिनकर
२२१ - नेवासा मतदारसंघ- बाळासाहेब मुरकुटे
२२२- शेवगाव मतदारसंघ- नारायण भगवान पालवे
२२३ - राहुरी मतदारसंघ - शिवाजीराव कर्डिले
२२४ - पारनेर मतदारसंघ - विश्वनाथ कोरडे
२२५ - अहमदनगर - भैय्या गंधे
२२६- श्रीगोंदा - बाळासाहेब महाडिक
२२७ - कर्जत-जामखेड मतदारसंघ - आमदार प्रा.राम शिंदे
No comments:
Post a Comment