पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-१७ जून
जामखेड - कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथील किशोर घोडेस्वार यांची हिंद सेवा मंडळाच्या भारत विद्यालय स्कूल कमिटी सदस्य पदी निवड करण्यात आली आहे.
मिरजगाव स्कूल कमिटीचे अध्यक्ष डॉ. रमेश झरकर, मुख्याध्यापक जे आर नन्नवरे यांनी किशोर घोडेस्वार यांना निवडीबद्दलचे पत्र दिले आहे.
किशोर घोडेस्वार गरीब कुटुंबातील असून तसेच मिरजगाव मध्ये कार्यात अग्रेसर असलेले स्वतः हा ची परवा न करता सर्वांच्या मदतीला धावून जाणारे सर्वांच्या सुखा दुःखात सहभागी होणारे किशोर घोडेस्वार यांची आज स्कूल कमिटी सदस्य पदी निवड झाल्याबद्दल त्यांच्यावर परिसरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन यावेळी किशोर घोडेस्वार यांनी दिले.
यावेळी नागापूर नगलवाडी सेवा सोसायटीचे चेअरमन रामचंद्र निंबोरे , आदर्श शिक्षक महादेव आखाडे गुरुजी, डॉ. भाऊसाहेब मोटे, गवारे सर, रसाळ सर, जेष्ठ पत्रकार किशोर आखाडे, जेष्ठ पत्रकार भाऊसाहेब वाडगे, फरताडे सर, दळवी सर आदी मान्यवर उपस्थित होते.
No comments:
Post a Comment