पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-१९ ऑगस्ट
जामखेड तालुक्यातील आरणगाव येथील अरण्येश्वर विद्यालयातील विद्यार्थींच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी शाळा प्रशासनाने विहिर करण्याचे काम सुरू केले असून असून या कामासाठी जामखेड पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांनी पाच हजार रूपयांची देणगी दिली आहे.
काल दि. १८ आॅगस्ट रोजी जामखेड पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांनी अरणगाव येथील अरण्येश्वर विद्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी शालेय परिसर, विद्यालयाची इमारत व विद्यालयाची शैक्षणिक प्रगती पाहून समाधान व्यक्त केले.
याप्रसंगी त्यांनी मुलांसाठी शाळेत सुरू असलेल्या विहिरीचे काम पाहुन या अनोख्या कामाचे कौतुक करत आपण या विद्यालयाचा विद्यार्थी या नात्याने विद्यालयात चालू असलेल्या विहीर कामासाठी रु. ५००१ देणगी दिली.
याप्रसंगी गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे सरपंच लहू शिंदे, विद्यालयाचे प्राचार्य तुकाराम चांडे, माजी प्राचार्य वराट, दीपक तुपेरे, दिपक पवार, जाधव सर, संजू शेळके, तांबे सर, शशिकांत गडदे, नवनाथ आडे, भागवत चांगुणे, दत्ता कसबे, मच्छिंद्र श्रीरामे, गावडे सर, मारुती खताळ, अ. हमीद तांबोळी त्याचप्रमाणे माने मॅडम, खताळ मॅडम, श्रीम.विद्या निंबोरे, सौ.एस एस शिंदे, श्रीमती. व्ही.ए.नवले, श्रीम.के के कदम ,श्रीम.ऋचा गोस्वामी, संजय राऊत, दादा ससाणे आदिंसह शिक्षक, विद्यार्थी व मान्यवर उपस्थित होते. उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा