पोलीस वारंट न्यूज नेटवर्क -२० ऑक्टोबर
जामखेड तालुक्यातील ऐतिहासिक खर्डा येथे उध्या दि २१ ऑक्टोबर रोजी कर्जत- जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतुन होत असलेल्या दसरा महोत्सवाची जयत तयारी सुरू असून ज्या ठिकाणी हा कार्यक्रम होणार आहे तेथील संपूर्ण परिसर स्वच्छ करून घेतला जात आहे.
आमदार रोहित पवार हे मतदार संघात विविध उपक्रम राबवत असतात गतवर्षी विजय दशमीच्या शुभमुहूर्तावर खर्डा येथे रावण दहन कार्यक्रम घेतला होता. त्याच पार्श्वभूमीवर यावर्षीही खर्ड्याच्या ऐतिहासिक किल्ल्याजवळील जगातील सर्वात उंच भगवा स्वराज्य ध्वजाच्या साक्षीने शस्त्र पूजन होणार असून ,या ठिकाणी कोल्हापूर मर्दानी खेळ यांचे शिवकालीन व युद्ध कलेची प्रात्यक्षिके, केरळमधील शबरी चेंडे डान्स ग्रुपचा चेंडे डान्स, पंजाब मधील वीर खालसा ग्रुपची घटका पारंपरिक नृते, या खेळासोबतच चित्तथरार साहसी प्रात्यक्षिके, तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर नेत्र दीपक व आकर्षक विद्युत रोषणाई व स्कायलाईट शो मध्ये कॅनडा व स्पेनमधील अद्यावत ध्वनी यंत्रणा तसेच इंटरनॅशनल लेझर शोचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे खर्डा किल्ल्यावरील दसरा महोत्सवाच्या माध्यमातून नागरिकांना हे सर्व कार्यक्रम पाहण्यासाठी मोठी पर्वणीच ठरणार आहे.
तेसच या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आमदार रोहित पवार यांच्या वतीने करण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा