पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-१५ नोव्हेंबर
जामखेड तालुक्यातील खर्डा येथील विजयी लढाईस २२८ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल श्री शिवप्रतिष्ठानच्या वतीने २२८ मशाली प्रज्वलित करून मानवंदना देत दीपोत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी छत्रपती श्री. शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करून कार्यक्रमाचे सुरुवात करण्यात आली. संपूर्ण खर्डा किल्ला व स्वराज्य ध्वजा जवळ सर्व मावळ्यांनी मशालीच्या पेटवल्या या प्रकाशाने किल्ला परिसर उजळून निघाला होता. यावेळी फटाके व तोफांचीही अतिषबाजी करण्यात आली. तसेच छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी, अशा घोषणांनी व शिवरायांच्या गीतांनी खर्डा किल्ला व परिसर दुमदुमून निघाला. यावेळी जामखेड,खर्डा, भूम येथील शिवप्रेमी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थिती मावळ्यांनी संपूर्ण किल्ल्याला मशाल प्रदक्षिणा घातली.
यावेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान जामखेड तालुका प्रमुख पांडुरंग भोसले यांनी आदरणीय संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली देव, देश, धर्म व राष्ट्रहितासाठी आम्ही कार्य करत आहोत. खर्डा इतिहास मराठ्यांच्या विजयाची साक्ष देणारा आहे. खर्डा किल्ल्यांचे बांधकाम उत्कृष्ट झाले पाहिजे यासाठी सर्वांनी लक्ष दिले पाहिजे. खर्डा नाहीतर शिवपट्टण असा उल्लेख सर्वांनी करावा रनटेकडी शौर्य स्थळाचे जतन झाले पाहिजे. छत्रपती श्री शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या विचारा शिवाय देशाला पर्याय नाही त्याचां आचार विचार सर्वांनी अंगीकृत केला पाहिजे असे मनोगत व्यक्त केले.
शेवटी शिवरायांच्या आठवावे रूप हे सामुहिक शौर्यगीत घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
No comments:
Post a Comment