पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-३ नोव्हेंबर
जामखेड तालुक्यातील खर्डा हद्दीतील सातेफळ येथील इयत्ता नववीत शिकणारा हरी अशोक मोरे सोळा वर्षीय तरुनाला विजेचा झटका लागून आज त्याचा मृत्यू झाला आहे.
तरुणानाच्या घराजवळील झाडाला बांधलेल्या वायरला हात लागून त्याला जोरात विजेचा करंट लागला व तिथून त्याला खाजगी हॉस्पिटल येथे नेण्यात आले व उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला असल्याने सातेफळ व खर्डा परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्याच्यामागे आई- वडील, आज्जी,दोन चुलत भाऊ व एक चुलता असा परिवार आहे.
No comments:
Post a Comment