पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-२९ नोव्हेंबर
कर्जत व जामखेड तालुक्यात विविध पायाभूत सुविधा निर्माण व्हाव्यात यासाठी आमदार प्रा.राम शिंदे यांनी हाती घेतलेल्या पाठपुराव्याला आणखीन एक यश मिळाले आहे. विविध विकास कामांसाठी ग्रामविकास विभागाने सुमारे 1 कोटी रूपयांचा निधी मंजुर केला आहे. आमदार राम शिंदे यांच्या पाठपुराव्यातून अनेक विकास कामे मार्गी लागत असल्याने मतदारसंघात जनतेत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
कर्जत व जामखेड तालुक्यात विविध पायाभूत सुविधा निर्माण व्हाव्यात यासाठी आमदार प्रा.राम शिंदे यांनी 2023-24 या आर्थिक वर्षांत सुचवलेल्या विविध विकास कामांना सरकारने मंजुरी दिली आहे. यासाठी एक कोटींचा निधी सरकारने मंजूर केला आहे. ही कामे लेखाशिर्ष 2515 1238 या योजनेतून होणार आहेत. याबाबतचा शासन निर्णय नुकताच ग्रामविकास व पंचायतराज विभागाने जारी केला आहे.
ग्रामविकास विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार जामखेड तालुक्यातील शिऊर ते जाधववस्ती, मानेवस्ती रस्ता खडीकरण मजबुतीकरण (8 लाख रूपये), पोतेवाडी येथील लक्ष्मण सगळे घर ते काटेवस्ती रस्ता काँक्रिटीकरण करणे (12 लाख रूपये), साकत येथील मुरुमकर वस्ती स्मशानभूमी सुशोभीकरण करणे (10 लाख रूपये), खुरदैठण येथील खंडोबा मंदिरासमोर सभामंडप बांधणे (10 लाख रूपये) ही कामे मंजुर करण्यात आली आहेत.
त्याच बरोबर कर्जत तालुक्यातील बेलगाव येथील खंडोबा मंदिरासमोर सभामंडप बांधणे (10 लाख रूपये), नागमठाण येथील शिंदेवस्ती येथे सिमेंट काँक्रिट रस्ता करणे (10 लाख रूपये), राक्षसवाडी बुद्रुक येथे बिरोबा मंदिरासमोर सभामंडप बांधणे (10 लाख रूपये), बजरंगवाडी येथे बाळूमामा मंदिरासमोर सभामंडप बांधणे (10 लाख रूपये), चिंचोली काळदात येथे मोहटादेवी मंदिरासमोर सभामंडप बांधणे (10 लाख रूपये), सौताडेवस्ती येथील विठ्ठल - रुक्मिणी मंदिर सुशोभीकरण करणे (10 लाख रूपये) ही कामे मंजुर करण्यात आली आहेत. आमदार प्रा.राम शिंदे यांच्या पाठपुराव्यातून कर्जत व जामखेड या दोन्ही तालुक्यात विकास कामांचा नवा झंझावात निर्माण झाल्याने जनतेत समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
चौकट
कर्जत व जामखेड तालुक्यात पायाभूत सुविधा निर्माण व्हाव्यात यासाठी 2023-24 या आर्थिक वर्षांत सुचवलेल्या विविध विकास कामांना सरकारने मंजुरी देत 1 कोटी रूपयांचा निधी मंजुर केला आहे. कर्जत-जामखेड मतदारसंघासाठी भरिव निधी मंजुर केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील तसेच महायुती सरकारचे मनापासून आभार!
- आमदार प्रा.राम शिंदे
No comments:
Post a Comment