पोलीस वारंट न्यूज नेटवर्क -१४ नोव्हेंबर
जामखेड तालुक्यातील खर्डा येथील कौतुका नदी ते कुमटकर टेलर दुकानापर्यंत गटारीची दुरावस्था झाली आहे, गटारीच्या बाजूलाच मोठमोठ्या काटेरी बाभळींना वेढा पडला असून, खर्डा गावात प्रवेश करणारा हा महत्त्वाचा रस्ता असून या रस्त्यावरून सुर्वेवाडी, कसबा गल्ली, चांभार वाडा, शिंपी गल्ली, शुक्रवार पेठ आधी भागातील लोकांची व महिलांची सतत वर्दळ असते. या ठिकाणाहून सकाळी दररोज पहाटे जॉगिंगला व व्यायामाला जाणाऱ्या लोकांची तर श्रीक्षेत्र सिताराम गडावर दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना नाक दाबून या रस्त्यानेच जावे लागत आहे. रस्त्याच्या लगत वाहणारी गटार ही उघड्यावर असून या गटारीच्या वासाने व दुर्गंधीने नागरिक त्रस्त झाले आहेत. गावातील अनेक भागातील गटारीचे पाणी शेवटी याच ठिकाणी येत असल्याने ही मोठी उड्यावरची गटार सतत दुर्गंधीच्या पाण्याने वाहत असते. उघड्यावर वाहणाऱ्या या गटारी मुळे भागात डासांचे प्रमाणही जास्त प्रमाणात झालेले आहे. त्यामुळे नागिरकांना आरोग्याचा धोका होण्याची मोठी शक्यता आहे . नागरिकांना अतोनात त्रास सहन कारवा लागत आहे .पण याकडे प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष आहे .
तसेच खर्डा येथे कौतुका नदीच्या पुलाजवळ पाण्याचे डपके साचले असून कोणीही त्याकडे लक्ष देत नसल्याने रस्त्याने ये-जा करणारे नागरिक व वाहनधारक यांना मोठा अतोनात त्रास सहन करावा लागत आहे. खर्डा येथून शिर्डी हैदराबाद महामार्गावर आत्ताच काही दिवसांपूर्वी पुलाचे काम झाले आहे. या पुलाच्या बाजूला जो पाण्याचा प्रवाह नदीला मिळला आहे.
तेथे पाणी साचुन मोठे डबके तयार झाले असून वाहनांच्या येण्या जाण्याने अंगावर घाण पाणी उडत आहे. शिर्डी हैद्राबाद हा महत्त्वाचा माहामार्ग असल्या कारणाने त्या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या गाड्यांचे प्रमाण मोठे आहे. तसेच
दररोज हजारो संख्येने शाळेतील विद्यार्थी याच रोडने जातात. एखादी गाडी आली की अंगावर घाण पाणी उडते.एकीकडे गटाऱ्यांची दुर्गंधी व दुसरीकडे पाण्याचे डबके प्रश्न जैसे थे ! याकडे कोणत्याही राजकीय नेत्याचे लक्ष व प्रशासनाचे लक्ष नाही. सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्याचे काम तरी कोण करणार? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे
चौकट
खर्डा शहर हे जामखेड तालुक्यातील सर्वात मोठे गांव असुन ऐतिहासिक दृष्ट्याही तितकेच महत्त्वाचे आहे. मात्र या गावच्या विकासाकडे प्रशासनाचे म्हणावे तेवढे लक्ष नाही. त्यामुळे येथील विकास कामे होताना दिसत नाहीत. यामुळे आमच्या बातमीच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे प्रश्न मांडत आहोत
No comments:
Post a Comment