पोलीस वारंट न्युज नेटवर्क : १८ डिसेंबर
भाजपा जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र सुरवसे यांनी वखार महामंडळाच्या अधिकाऱ्याला एक कॉल करून सुशिक्षित बेरोजगार युवकाला शाश्वत रोजगार मिळवून देत त्याचे भविष्य उजळून टाकले आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, जामखेड तालुक्यातील खर्डा येथील रहिवासी सुशिक्षित बेरोजगार युवक अनिकेत सुधीर शिंदे या युवकाला नोकरीची अत्यंत आवश्यकता असल्याने त्याने भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र सुरवसे यांच्याशी संपर्क करत आपल्याला काही तरी काम द्यावे अशी विनंती केली. अनिकेत सुधीर शिंदे यास कामाची अत्यंत आवश्यक असल्याचे सुरवसे यांच्या लक्षात आल्याने त्यांनी खर्डा येथील वखार महामंडळाच्या युनिटचे संबंधित अधिकारी यांच्याशी फोनवरून तात्काळ संपर्क केला. त्याची व संबधित तरूणास रोजगाराची अत्यंत आवश्यकता असून आपण अनिकेत सुधीर शिंदे या युवकास त्याच्या शैक्षणिक पात्रतेनुसार काम द्यावे अशी विनंती वजा सुचना केली. यानुसार वखार महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सदर तरूणास खर्डा युनिट मध्ये काॅन्ट्रक्ट बेसवर शाश्वत रोजगार देत नोकरीची संधी मिळवून दिली आहे. अत्यंत गरजू असणाऱ्या अनिकेत सुधीर शिंदे या युवकाला रवींद्र सुरवसे यांच्यामुळे नोकरी मिळाली आहे.
खर्डा व पंचक्रोशीतील जनतेच्या व्यक्तिगत व सार्वजनिक कामांसाठी नेहमीच अग्रेसर असणारे धडाडीचे व्यक्तिमत्व म्हणून रवि दादा सुरवसे यांना ओळखले जाते. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणारे दादा अशी त्यांची ओळख आहे , त्याच पार्श्वभूमीवर खर्डा येथील वखार महामंडळ येथे सुशिक्षित युवा तरुण अनिकेत सुधीर शिंदे याला दिनांक १६ डिसेंबर २०२३ रोजी नोकरीची संधी मिळाली असून सदर युवकाने ही संधी मला रवींद्र सुरवसे यांच्यामुळे मिळाले असल्याची माहिती पोलीस वारंट न्यूज नेटवर्कशी बोलताना दिली आहे ." मला अत्यंत नोकरीची गरज असताना रवी दादा सुरवसे यांनी मदतीचा हात पुढे करून मला संधी दिली आहे. याबद्दल मी व माझा परिवार रविंद्र सुरवसे यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. अश्या भावना व्यक्त केल्या.
No comments:
Post a Comment