पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-२०डिसेंबर
जामखेड तालुक्यातील खर्डा हद्दीतील नागोबाचीवाडीला आमदार राम शिंदे व खासदार सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून ग्रामदैवत श्री. नागोबा मंदिरासाठी १० लक्ष व तुळजाभवानी मंदिरासमोर सभामंडपा करिता १० लक्ष असा एकूण २०लक्ष रुपये निधी आमदार राम शिंदे व खासदार सुजय विखे यांच्या माध्यमातून मिळालेला असून त्या कामाचे भूमीपूजन नागोबाचीवाडी येथील ग्रामस्थांच्या हस्ते करण्यात आले आहे.
या मंदिर परिसरात सोई सुविधा व्हाव्यात अशी मागणी अनेक वर्षांपासून भाविक भक्त करत होते. याचाच विचार करून भाजपा कार्यकर्त्यांनी केलेल्या पाठपुराव्याची दखल घेऊन खासदार सुजय विखे व आमदार राम शिंदे यांनी स्थानिक विकास निधी मधून २० लक्ष रुपये निधी उपलब्ध करून दिल्याने कार्यकर्ते व भाविक भक्तांनी आनंद व्यक्त करत आमदार राम शिंदे व खासदार सुजय विखे पाटील यांचे आभार मानले आहेत .
कर्जत -जामखेड मतदारसंघातील विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आमदार प्रा राम शिंदे यांनी वैयक्तिक पातळीवर लक्ष घालून शासन दरबारी जोरदार पाठपुरावा हाती घेतला आहे. गेल्या पाच सहा महिन्यांनपासून मतदारसंघासाठी आमदार प्रा राम शिंदे यांनी कोट्यावधी रूपयांचा निधी मंजुर करून आणला आहे, तसेच स्थानिक विकास निधीतून कोट्यावधी रूपयांची कामे प्रस्तावित केली आहेत, यामुळे मतदारसंघात आमदार प्रा राम शिंदे यांच्या माध्यमांतून विकासाचा नवा झंझावात निर्माण झाला आहे. यामुळे मतदारसंघातील जनतेत आनंदाचे वातावरण पसरले आहे. आमदार प्रा राम शिंदे यांनी टीका टिप्पणीचे राजकारण न करता विकासाच्या राजकारणावर लक्ष केंद्रित केले आहे. यामुळे विरोधकांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.
No comments:
Post a Comment