जामखेड : ३२ वर्षीय तरुणाचा खून दोघांना अटक - police warrant kharda

police warrant kharda

संपादिका -श्वेता बापूसाहेब गायकवाड-9970529697 / कार्यकारी संपादक- आशुतोष गायकवाड- 8888785253,

🚨 पोलिस वॉरंट न्यूजवर आपले सहर्ष स्वागत आहे 🚨 ताज्या घडामोडी | स्थानिक व राष्ट्रीय बातम्या | शैक्षणिक माहिती | सामाजिक प्रश्न आपल्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा... धन्यवाद 🙏

  • Home
  • शिक्षण
  • राजकीय
  • रक्तदान
  • ठळक बातम्या
  • जामखेड शहर
  • खर्डा शहर
  • कर्जत-जामखेड
  • आरोग्य

Breaking

गुरुवार, १४ डिसेंबर, २०२३

Home जामखेड पोलीस स्टेशन जामखेड : ३२ वर्षीय तरुणाचा खून दोघांना अटक

जामखेड : ३२ वर्षीय तरुणाचा खून दोघांना अटक

गुरुवार, डिसेंबर १४, २०२३ जामखेड पोलीस स्टेशन,



पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-१४ डिसेंबर

आपल्या मोबाईलवर मोठ्याने शिवीगाळ करत असल्याच्या कारणावरून तिघांनी एका ३२ वर्षीय तरूणास गज व लाकडी बांबूने मारहाण केल्याने तो गंभीर जखमी झाल्याने उपचार घेत असताना त्याचा मृत्यू झाल्याने मारहाण करणाऱ्या तिघांवर जामखेड पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल केला असून दोन जणांना ताब्यात घेतले आहे. ही घटना काल दि. १३ डिसेंबर रोजी सायंकाळी ७:४५ सुमारास बोर्ले ते जवळा रस्त्यावरील पठाडे वस्ती जवळ घडलीआहे. या प्रकरणी सुरेश बाबुराव पठाडे, आदित्य (उर्फ) गोपाल सुरेश पठाडे व एक आनोळखी सर्व रा. जवळा फटा, पठाडे वस्ती, जवळा. ता. जामखेड आशा तीन जणांविरोधात जामखेड पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, जामखेड तालुक्यातील बोर्ले येथिल मयत शिवाजी रामदास चव्हाण हा आपल्या नातेवाईकांसमवेत दि. १३ डिसेंबर २०२३ रोजी बोलें ते जवळा रोडवरील एका हॉटेलमध्ये गेला होता. यावेळी सायंकाळी ७:४५ वा मयत शिवाजी चव्हाण हॉटेलच्या बाहेर कोणाशीतरी फोनवर मोठ्याने बोलत शिवीगाळ करत होता. त्या ठिकाणी दुसरा व्यक्ती म्हणजे आरोपी सुरेश बाबुराव पठाडे हा आला व शिविगाळ का करतो या कारणावरून दोघांमध्ये बाचाबाची होऊन जोराचे भांडण लागले.

या भांडणाची माहीती मयताचे वडील रामदास चव्हाण यांना समजताच ते आपल्या पत्नीसह मोटारसायकलवरून तातडीने त्या ठिकाणी पोहचले. यावेळी आरोपी सुरेश पठाडे, आदित्य (उर्फ) गोपाल सुरेश पठाडे व एक अनोळखी इसम आसे तीघे जण शिवाजी यास जग व लाकडी बांबूने मारहाण करत होते. यावेळी त्या ठिकाणी असलेले शिवाजीचे नातेवाईक लक्ष्मण सुखदेव मते, फीर्यादीचा पुतण्या निलेश अभिमान चव्हाण व मयताचे आई- वडील हे भांडण सोडवण्याचा प्रयत्न करत होते. मात्र आरोपी हे ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. यावेळी आरोपी सुरेश पठाडे सह इतर आरोपींनी शिवाजीला गजाने व लाकडाने मारहाण केली व शिवीगाळ करून घटनास्थळाहुन निघुन गेले.

या मारहाणीत शिवाजी रामदास चव्हाण (वय ३२) वर्षे रा. बोर्ले

ता. जामखेड हा गंभीर जखमी झाला. शिवाजीच्या डोक्याला मार लागल्याने रक्तस्त्राव होत होता. यानंतर घटनेची माहिती समजताच फीर्यादी यांच्या भावाची मुले दिलीप चव्हाण व अंकुश चव्हाण हे घटनास्थळी आले त्यांनी तातडीने जखमी शिवाजीस जामखेड येथील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र दि १४ डिसेंबर २०२३ रोजी पहाटे ४ वाजता शिवाजी चव्हाण याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मयत शिवाजी चव्हाण यांच्यावर जामखेड ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. मोबाईल फोनवरून इतर व्यक्तीला शिवाजी ने फोनवर शिवीगाळ केली म्हणून दुसऱ्याच व्यक्तीच्या मारहाणीत शिवाजीला नाहक आपले प्राण गमवावे लागले. मोबाईलवर फोनच्या बोलण्यावरून हा खुन झाल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

घटनेची माहिती मिळताच कर्जत उपविभागाचे पोलिस उपअधीक्षक शशिकांत वाखारे, जामखेडचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. तातडीने जामखेड पोलीस स्टेशन चे पोलीस हॅकॉन्स्टेबल संजय लोखंडे, पोलीस पोलीस हेडकॉन्स्टेबल अजय साठे, पोलीस नाईक अविनाश ढेरे, पोलीस कॉन्स्टेबल नवनाथ शेकडे, प्रविण पालवे, प्रकाश जाधव, यांनी तपास करीत दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय लोखंडे,  पोलीस  हेड कॉन्स्टेबल अजय साठे , पोलीस नाईक अविनाश ढेरे , पोलीस कॉन्स्टेबल नवनाथ शेकडे, प्रवीण पालवे,  प्रकाश जाधव तपास करत आहेत
Tags # जामखेड पोलीस स्टेशन
  • Tweet
  • Share
  • Pin it
  • Comment
  • Whatsapp
Author Image

About Unknown

जामखेड पोलीस स्टेशन
Posted at गुरुवार, डिसेंबर १४, २०२३
यास ईमेल कराहेब्लॉगकरा!X वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा
Labels जामखेड पोलीस स्टेशन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

नवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)
श्वेता बापूसाहेब गायकवाड संपादिका-सा.पोलीस वारंट मो नंबर-९९७०५२९६९७

श्वेता बापूसाहेब गायकवाड संपादिका-सा.पोलीस वारंट मो नंबर-९९७०५२९६९७

Blogger द्वारे प्रायोजित.

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क

संपादिका -श्वेता बापूसाहेब गायकवाड-9970529697 / कार्यकारी संपादक- आशुतोष गायकवाड- 8888785253,

Popular Posts

Popular Posts

Labels

  • अरणगाव (2)
  • अहमदनगर (8)
  • अहमदनगर बातम्या (1)
  • अहमदनगर पोलीस (1)
  • अहमदनगर पोलीस स्टेशन (2)
  • अहमदनगर शहर (3)
  • अहिल्यानगर पोलीस (1)
  • आरोग्य (1)
  • आहिल्यानगर पोलीस (2)
  • आहिल्यानगर पोलीस स्टेशन (1)
  • आहिल्यानगर बातम्या (1)
  • कर्जत (2)
  • कर्जत -जामखेड (1)
  • कर्जत पोलीस स्टेशन (1)
  • कर्जत-जामखेड (24)
  • केज पोलीस स्टेशन (1)
  • क्राईम (18)
  • क्राईम न्यूज (1)
  • क्राईम बातम्या (115)
  • खर्डा (1)
  • खर्डा ग्रामपंचायत (1)
  • खर्डा पोलीस स्टेशन (128)
  • खर्डा प्रतिनधी (1)
  • खर्डा शहर (331)
  • खर्डा शहर ठळक (1)
  • चोंडी (2)
  • चौंडी (1)
  • जवळा (1)
  • जातेगाव (2)
  • जामखेड (3)
  • जामखेड ठळक (2)
  • जामखेड पोलीस स्टेशन (176)
  • जामखेड शहर (175)
  • जामखेड शहर बातम्या (1)
  • जिल्हाधिकारी बातम्या (1)
  • ठळक बातम्या (429)
  • डोणगाव बातम्या (1)
  • तेलंगशी बातम्या (1)
  • थळक बातम्या (1)
  • दिघोळ बातम्या (1)
  • दुःखद बातम्या (11)
  • धानोरा ग्रामपंचायत (1)
  • नगर (1)
  • नगर पोलीस स्टेशन (1)
  • नायगाव (2)
  • नेवासा पोलीस स्टेशन (11)
  • नेवासा बातम्या (2)
  • नेवासा शहर (2)
  • पर्यावरण (1)
  • पोलीस स्टेशन (1)
  • बांधखडक (2)
  • बांधखडक बातम्या (2)
  • बातम्या (8)
  • बावी (2)
  • बाळगव्हाण (3)
  • बीड क्राईम बातम्या (1)
  • बीड पोलीस स्टेशन (5)
  • बीड शहर (2)
  • भूम बातम्या (1)
  • मिरजगाव पोलीस स्टेशन (2)
  • मोहरी बातम्या (1)
  • रक्तदान (1)
  • राजकीय (86)
  • राजकीय ठळक (6)
  • राजकीय ठळक बातम्या (1)
  • राजकीय बातम्या (362)
  • लोणी ग्रामपंचायत (1)
  • शहर ठळक बातम्या (3)
  • शालेय (5)
  • शालेय बातम्या (1)
  • शिर्डी पोलीस स्टेशन (2)
  • शिर्डी बातम्या (1)
  • शिक्षण (1)
  • शैक्षणिक (2)
  • शैक्षणिक बातम्या (45)
  • साकत (6)
  • साकत बातम्या (1)
  • सातेफळ (1)
  • सामजिक बातम्या (33)
  • सामाजिक (23)
  • सामाजिक ठळक (1)
  • सामाजिक बातम्या (104)
  • सोनेगाव (7)
  • सोलापूर ठळक बातम्या (1)
  • स्थानिक गुन्हे शाखा (33)
  • स्थानिक गुन्हे शाखा नगर (1)
  • स्थानीक गुन्हे शाखा (3)
  • हळगाव (2)
  • dysp संतोष खाड़े (1)
  • Vote (1)

पोलीस वारंट समाजातील प्रत्येक घटकांच्या घडामोडी, कला आणि साहित्य क्षेत्रातील उत्तुंग भरारी, खेळ आणि क्रीडा विश्वातील यशस्वी दौड, शिक्षण व शैक्षणिक वाटचाल, राजकारण आणि सामाजिक माहिती, गुन्हेगार आणि समाजातील विकृती, जनजागृती आणि जनसामान्यांच्या भावना आपल्या लेख, कथा, काव्य, गोष्टी, व बातम्यांच्या माध्यमातून समाजापुढे मांडत असते.

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

POLICE WARRANT ©2023 All rights reserved Developed By DIGITAL FLY KHARDA

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *