पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-१७ जानेवारी
जामखेड तालुक्यातील खर्डा येथील जेष्ठ नेते कल्याणराव (काका) गोलेकर यांचे वयाच्या ७७ व्या वर्षी प्रदीर्घ आजाराने राहत्या घरी दुःखद निधन झाले असून त्यांचा अंत्यविधी आज दि. १७ जानेवारी रोजी खर्डा येथे कैकाड झरा जवळील त्यांच्या शेतात संध्याकाळी ६ :०० वाजताचे सुमारास होणार असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांच्या वतीने देण्यात आली आहे. काका गोलेकर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा संघटक विजयसिंह गोलेकर यांचे ते वडील होते. त्यांच्या जाण्याने तालुक्यातील एक सच्चा नेता गेल्याची भावना असून खर्डा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
दिवंगत नेते काका गोलेकर हे अतिशय सुस्वाभावी, मनमिळाऊ, सतत हसतमुख राहणारे नेते म्हणून ओळखले जात होते. खर्डा व पंचक्रोशीत काका या नावाने त्यांची ओळख होती. लहानांपासून थोरांपर्यंत त्यांचा परिचय होता. राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरदचंद्र पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून त्यांनी राजकीय जीवनात काम केले होते. त्यांनी जामखेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाअध्यक्ष म्हणून काम केले होते.
नोकरी करीत असताना त्यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटीविला होता. पंचायत समितीचे माजी सदस्य व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा संघटक विजयसिंह गोलेकर यांचे ते वडील होत. त्यांच्या दुःखद निधनाने खर्डा शहरावर शोककळा पसरली आहे. त्यांचा अंत्यविधी खर्डा येथे कैकाड झरा जवळील त्यांच्या शेतात येथे आज. दि. १७ जानेवारी रोजी संध्याकाळी ६:०० वाजता होणार आहे. त्यांच्या मागे पत्नी एक मुलगा, तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
No comments:
Post a Comment