पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-१७ जानेवारी
जामखेड तालुक्यातील खर्डा येथे आज खासदार सुजय विखे पाटील यांच्या हस्ते विविध विकास कामांचे पूजन करण्यात आले असून खासदार सुजय विखे व आमदार राम शिंदे यांच्या प्रयत्नातून खर्डा व परिसरातील वाड्या वस्त्यांकरिता १८कोटी ४५.४९ किमतीच्या विविध विकासकामांचा भूमिपूजन उद्घाटन समारंभ आज सकाळी ९ वाजता संपन्न झाला आहे
यावेळी सुजय विखे बोलताना म्हणाले आज जामखेड तालुक्यासाठी निधीची कोणतीही कमतरता भासून न देता प्रत्येक गावामध्ये निधी पोहोचवण्याचे प्रामाणिक काम केले आहे याचे फलित म्हणजे विकास कामांचा ओघ हा वाढतच आहे आज प्रत्येक गावामध्ये जात असताना कोणत्या ना कोणत्या प्रकारचा निधी देऊन त्या गावातील विकास कामांना प्राधान्य दिले जात आहे आणि ही वाटचाली यापुढेही सुरूच राहील असे सांगितले
यावेळी उपस्थित भाजपा जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र सुरवसे ,सरपंच संजीवनी पाटील , बाजार समिती संचालक वैजीनाथ पाटील ,माजी जिल्हा परिषद सदस्य कांतीलाल खिवांसरा , माजी सरपंच संजय गोपाळघरे, ग्रामपंचायत सदस्य व सोपान गोपाळघरे ,महेश दिंडोरे,नानासाहेब गोपाळघरे, बाजीराव गोपाळघरे , बाळासाहेब गोपाळघरे , गणेश शिंदेंसह भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विशेष म्हणजे देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या माध्यमातून शाश्वत विकास साधण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून पुरेपूर निधी हा जनसामान्यांना उपलब्ध होत असतो असे यावेळी खासदार सुजय विखे म्हणाले दरम्यान आज सुजय विखेंच्या उपस्थितीमध्ये खर्डा येथे चार किलो साखर व चणाडाळ वाटपाचा कार्यक्रम देखील संपन्न झाला . यावेळी साखर व चनाडाळ घेण्याकरिता नागिरकांची झुंबड उडाली होती.
No comments:
Post a Comment