पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-१९ जानेवारी
जामखेड तालुक्यातील खर्डा येथे आरोग्य यंत्रना अधिक सक्षम व्हावी रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत, कोणत्याही रुग्णाला उपचाराअभावी त्रास सहन करावा लागू नये व मतदार संघातील जनतेस आरोग्यसेवा मिळावी या उद्देशाने कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या माध्यमातून खर्डा येथे
आमदार रोहित पवार यांच्या प्रयत्नातून रुग्णवाहिका देण्यात आली आहे.
गेल्या आठ दिवसांपूर्वीच खर्डा येथे आमदार रोहित पवार आले असता खर्डा येथील ग्रामस्थांनी , युवकांनी, सामजिक कार्यकर्ते दत्तराज पवार यांनी खर्डा व परिसरातील आरोग्याच्या सुविधा बद्दल प्रश्न मांडले होते , व चर्चा केली होती खर्डा व परिसरात रुग्णवाहिकेसाठी नागरिकांची होणारी पिळवणूक यासाठी रुग्णांना होणार त्रास सहन करावा लागत होता . त्यासाठी आमदार रोहित पवार यांना रुग्णवाहिकेसाठी विनंती केली तरी यवूकांच्या विनंतीला मान देऊन रोहित पवार यांनी दि.१७/०१/२०२४ रोजी संत श्री सिताराम बाबा गड खर्डा येथे कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या माध्यमातून रुग्णवाहिका देण्यात आली. यावेळी श्री. सिताराम बाबा गडाचे मठाधिपती महालिंग महाराज नगरे यांच्या शुभहस्ते या रुग्णवाहिकीचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी स्थानिक पदाधिकारी , कार्यकर्ते ,युवा वर्ग , भाविकभक्त उपस्थित होते . यावेळी आमदार रोहित पवार यांचे खर्डा व परिसरातील नागिरकांनी आभार व्यक्त केले.
No comments:
Post a Comment