पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-२० जानेवारी
जामखेड तालुक्यातील खर्डा येथे आमदार रोहित पवार यांच्या प्रयत्नातून व सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत खर्डा व जामखेड शहराजवळील रस्ता रुंदीकरण रस्ता दुभाजक व डांबरीकरण या कामासाठी पंधरा कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता.जामखेड शहरा जवळील रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे, तसेच खर्डा येथील ऐतिहासिक खर्डा किल्ला ते सिताराम गडाच्या पायथ्यापर्यंत रस्त्याचे काम व रस्ता रुंदीकरण हे काम पूर्ण झाले होते.
परंतु सोनेगाव चौक ते कौतुका नदीपर्यंतचे काम गेली अनेक महिन्यापासून प्रलंबित राहिले होते. त्यामुळे खर्डा बस स्थानक परिसरातील अतिक्रमणे सांडपाण्याची व्यवस्था नसल्याने गटारीचे पाणी कौतुका नदी जवळ साचत होते. त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी येत होती सर्वांना याचा त्रास सहन करावा लागत होता याबाबत अनेक निवेदने व वृत्तपत्रात बातम्याही प्रसिद्ध झाल्या होत्या, काही युवकांनी व पत्रकारांनी सार्वजनिक बांधकाम खात्याकडे रस्त्याचे व गटारीचे राहिलेले अर्धवट काम पूर्ण करण्यासाठी रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला दिल्यानंतर संबंधित ठेकेदाराने सर्व यंत्रणा राबऊन सिमेंटचे काँक्रीटची गटार काम, रस्ता रुंदीकरण, अतिक्रमण काढणे व रुंदीकरणचे काम अत्यंत वेगाने व चांगल्या पद्धतीने रात्रंदिवस काम सुरू ठेवले व बस स्थानक परिसरातील भव्य दिव्य अशा रस्त्याचे डांबरीकरणाचे काम पूर्ण केले असून नागरिकांमध्ये समाधानाचे व आनंदाचे वातावरण पसरले आहे
याच पार्श्वभूमीवर दि १९ जानेवारी रोजी खर्डा बसस्थानक येथे सकाळी १० वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बसस्थानक परिसरात नारळ वाढवून डांबरीकरण करण्याच्या कामाचे पूजन केले यावेळी माजी. उपसरपंच श्रीकांत लोखंडे , सोसायटी व्हॉईस चेअरमन शिवाजी भोसले, सामाजिक कार्यकर्ते भीमराव घोडेराव यांनी आमदार रोहित पवारांचे आभार व्यक्त केले
यावेळी उपस्थित खर्डा सेवा सोसायटीचे चेअरमन मुकुंद आप्पा गोलेकर, सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय भोसले, ग्रामपंचायत सदस्य महालिंग कोरे, वैभव जमकावळे, अशोक खटावकर, चंद्रकांत गोलेकर, संदीपान गेजगे,शशिकांत गुरसाळी, दिलदार भाई बागवान, विकास शिंदे, संदीप बिरंगळ, सुहास मदने, नाना जावळे, दत्ता पिंगळे,पत्रकार दत्तराज पवार,धनसिंग साळुंके इत्यादी सह खर्डा ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment