पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-२१ जानेवारी
आमचे नगर परिषदेत समावेशन करावे अशी मागणी जामखेड ग्रामपंचायत कालीन सफाई कामगारांनी विधान परिषदेचे आमदार आ. राम शिंदे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. काल दि. २० जानेवारी रोजी चोंडी येथील निवासस्थानी जाऊन याबाबतचे निवेदन यांना देण्यात आले आहे. यावरून लवकरच जामखेड नगरपरिषद सफाई कर्मचारी यांचे शिष्ट मंडळ घेऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन काम मार्गी लावण्यात येईल असे आश्वासन आ. राम शिंदे यांनी दिले आहे. काल दि. २० जानेवारी रोजी जामखेड नगरपरिषद सफाई कामगार (ग्रामपंचायत कालावधी पासून काम करत असलेले सफाई कामगार) यांनी विधान परिषदेचे आमदार प्रा. राम शिंदे. यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी जामखेड नगरपरिषद सफाई कामगार भाजपा जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र सुरवसे, सामाजिक कार्यकर्ते विकी सदाफुले, सरपंच लहू शिंदे बापूराव ढवळे पांडुरंग उबाळे उपस्थित होते.
सदर निवेदनात म्हटले आहे की, आम्ही जामखेड ग्रामपंचायत मधील विविध पदावर सुमारे १२८ कर्मचारी कार्यरथ होतो. साधारण ८ वर्षांपूर्वी दि. १५ जून २०१५ रोजी भूतपूर्व ग्रामपंचायतीचे नगरपरिषदेत रुपांतर करण्यात आले. त्यावेळी १४ कर्मचाऱ्यांचे नगरपरिषदेच्या आकृतिबंधातील पदावर समावेशन करण्यात आले. इतर कर्मचारी यांचे आकृतीबंधात पद उपलब्ध नसल्याने व काही पदाकरिता कर्मचारी यांच्याकडे शैक्षणिक पात्रता नसल्याने समावेशन झाले नाही. त्यामुळे सफाई कामगार यांचा आकृतीबंध मंजूर नसल्याने सफाई कामगारांचे नगरपरिषदेत समावेशन करण्यात आले नाही. त्यामुळे ग्रामपंचायत मागणी करण्यात येत आहे.
कालावधीपासून सदर ११४ कर्मचारी रोजंदारी कामगार म्हणून विविध पदावर कार्यरत असून त्यामध्ये पाणीपुरवठा विभागात २५, अग्निशमन विभागात ५, कार्यलयीन कामाकाजा करिता २०, विद्युत विभागात १० व आरोग्य विभागात ५४ कर्मचारी कार्यरत आहेत. हे सर्व कमर्चारी अतिशय कमी वेतनावर गेली २० ते २५ वर्ष पासून काम करीत आहेत. त्यामुळे सदर कर्मचाऱ्यांची आर्थिक परिस्थिती अतिशय दयनीय असून त्यांना अतिशय हलाखीच्या परिस्थितीत आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करावा लागत आहे. त्यामुळे कर्मचारी यांच्यावर मानसिक तनाव येत आहे. यामुळे आम्हा कर्मचाऱ्यांचे नगर परिषदेत समावेशन करावे अशी
No comments:
Post a Comment