पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-२२ जानेवारी
अयोध्या येथे दिनांक २२जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली यासाठी देशातील नामांकित व्यक्ती साधू संत,महंत देशातील उद्योजक व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. अवघा भारत देश हा श्रीराम मय झाला होता सगळीकडे जय श्रीरामाच्या घोषणा देण्यात येत होत्या यामध्ये सर्व धर्मीय लोक सहभागी झाले होते.
त्याच पार्श्वभूमीवर कार्यक्रमाचे औचित्य साधून खर्डा येथील तांबोळी चौकात मोहसीन तांबोळी या मुस्लिम युवकाने पुढे होऊन पंधरा फूट श्रीरामाचे डिजिटल फ्रेम तयार केली होती तसेच अयोध्या येथील श्रीरामाच्या मंदिराची प्रतिकृती तयार करून श्रीरामाच्या फोटोला फुलांची आकर्षक पद्धतीने सजावट केली होती,चौकात श्रीरामाच्या फोटो समोर श्रीराम मंदिराची प्रतिकृती ठेवून त्याचे पूजन व आरती मोठ्या उत्साहात सर्वधर्म मित्रपरिवाराच्या वतीने करण्यात आली होती.
खर्डा व परिसरात मोठे भक्तिमय वातावरण तयार झाले होते .कार्यक्रमानंतर सर्वांना पेढ्याच्या प्रसादाचे वाटप यावेळी करण्यात आले .
त्याचबरोबर येथील पुरातन काळातील राम हवेली श्रीराम मंदिरात दुपारी महंत बालयोगी ब्रह्मचारी सद्गुरु सन्यासी पागल बाबा व आसाराम लद्दड यांच्या हस्ते आरती करण्यात आली यावेळी श्रीराम चंद्र की जय चा जयघोष करण्यात आला व सर्वांना लाडूचा प्रसाद वाटप करण्यात आले.
श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने भावीक भक्त या ठिकाणी उपस्थित होते.
सर्वत्र आनंदाचे वातावरण यावेळी पसरले होते याप्रसंगी सर्वपक्षीय, सर्वधर्मीय कार्यकर्ते, महिला भगिनी व खर्डा ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment