पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-२३ जानेवारी
पत्रकारिता मोठे कठीण काम आहे. सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचा काम निर्भीडपणे पत्रकार करत आहेत . आज आम्ही खर्डा येथील पत्रकारांचा सन्मान करत आहोत ही गोष्ट आमच्यासाठी सन्मानाची आहे. खर्डा जिल्हा परिषद शाळेच्या अनेक सकारात्मक बातम्या पत्रकार लावत असतात मी आज खर्डा येथील सर्व पत्रकारांचे आभार व्यक्त करतो असे प्रतिपादन खर्डा जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक राम निकम सर यांनी केले.
आज दि.२३ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता नेताजी सुभाष चंद्रजी भोस यांची जयंती व खर्डा येथील पत्रकारांचा येथूचित सत्कार खर्डा जिल्हा परिषद शाळेच्या वतीने करण्यात आला असून यावेळी
उपस्थित पत्रकार किशोर दुषी, संतोष थोरात , श्वेता गायकवाड ,दत्तराज पवार, धनसिंग साळुंखे, अनिल धोत्रे, महेश बजगुडे इत्यादी पत्रकारांचा पुष्प गुच्छ व फाईल देऊन सत्कार करण्यात आला
यावेळी मुख्याध्यापक खर्डा जिल्हा परिषद शाळा मुले राम निकम , मुख्याध्यापक खर्डा मुली बाबुराव गीते , उर्दू शाळा मुख्याध्यापक शेख सर यांनी आपले मनोगते व्यक्त केली.यावेळी पत्रकार सर्व शिक्षक स्टाफ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पत्रकारांच्या वतीने किशोर दुषी, संतोष थोरात ,श्वेता गायकवाड, दत्तराज पवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले
No comments:
Post a Comment