पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-१९ फेब्रुवारी
छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार पुढील पिडीपर्यंत कसे जातील त्याकरिता आपल्या सर्वांनीच प्रयत्न करावे लागतील .तसे प्रयन्त या संघटना आणि समितीच्या माध्यमातून होत आहेत ही एक चांगली गोष्ट आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची एक मोठी मूर्ती अनेक मान्यवरांच्या वतीने त्यांच्या सहकार्यातून इथे आज खर्डा गावाला दिली गेली आहे. आणि त्यांचा मानसन्मान ज्या पध्दतीने ठेवायचा असतो त्या पद्धतीने आपण सर्वजण ठेवू आणि पुढच्या वर्षी खर्डा येथे मोठा कार्यक्रम आपण घेऊया जो कुठला कार्यक्रम तुम्ही सांगाला सामाजिक ,लोकांना चांगला विचार मिळावा यासाठी अध्यात्मिक असेल किंवा मनोरंजनाचा कार्यक्रम असेल तुम्ही सांगाल तो कार्यक्रम घेणार , आणि पुढच्यावर्षी जयंती मोठी झालीच पाहिजे असे प्रतिपादन करून आमदार रोहित पवार यांनी सर्वांनी जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या.
जामखेड तालुक्यातील खर्डा येथे आज शिवजयंती उत्सव समिती व शिवपट्टण विकास युवा मंचाच्या वतीने खर्डा बसस्थानक येथे सार्वजनिक शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन व अभिवादन आमदार रोहित पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी तालुकाध्यक्ष विजयसिंह गोलेकर म्हणाले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यात सर्व जाती-धर्माचे मावळे होते त्या माध्यमातून महाराजांनी अठरापगड जातींचा सन्मानच केला त्यांच्या कार्याचा आदर्श घेऊन आपणही चालले पाहिजे. असे मत व्यक्त करून सर्वांना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी उपस्थित आमदार रोहित पवार , तालुकाध्यक्ष विजयसिंह गोलेकर , सह्ययक पोलीस निरीक्षक विजय झंझाड़ , रमेश आजबे, मोहरी उपसरपंच हनुमंत बारगजे, सामजिक कार्यकर्ते बबलू गोलेकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ ,पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते
No comments:
Post a Comment