पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-२१ फेब्रुवारी
जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज संस्थान यांच्या वतीने रुग्णांची रक्ताची गरज भागवण्यासाठी नगर जिल्ह्यातील विविध ठिकाणी १० फेब्रुवारी ते २५ फेब्रुवारी कालावधीत महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून आज दि २१ फेब्रुवारी रोजी जामखेड तालुक्यातील खर्डा येथील लाड हॉस्पिटल , बस स्टँड जवळ आज सकाळी ८ ते सायंकाळी ५ यादरम्यान खर्डा येथे जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान यांच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न झाले. यामध्ये ११० रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे.
यावेळी न्यु अर्पण ब्लड सेंटर अहमदनगर डॉ .पुजारी श्रीकांत,मेडिकल ऑफिसर पवार भाग्यश्री-जनसंपर्क अधिकारी जैन तेजस, शिंदे ज्योती,व्यवर-थापक परिचारिका समाधान बुद्ड प्रियंका,रक्तपेढी तंत्रज रक्तपेढी तंत्रज्ञ
पाथर मोनिका, ओम बाबर,मुंडलिक दुर्वेश, सरपंच संजविनी पाटील , सामजिक कार्यकर्ते बबलू गोलेकर, गणेश ढगे, विनोद गटकळ, किशोर नाईक, सचिन वडे, संदीप वडे, रोहन चावने, सूरज कोठावळे, बाला भुते, नितीन कणसे,किशोर नाईक. यांनी व खर्डा ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रक्तदान केले आहे.
चौकट
रक्त संबंधित विविध आजार ब्लड कॅन्सर ,सिकलसेल, अनिमिया, हिमोफिलिया, थलेसेमिया, किडनी फेल्यूअर आदी आजारांनी ग्रस्त रुग्णांना रक्ताची वारंवार आवश्यकता असते महाराष्ट्र शासनाच्या रक्त पिढ्यांना रक्त देण्याचे आमच्या संप्रदायामार्फत निश्चित करण्यात आले आहे स्वस्वरूप संप्रदायाकांकडून नियमित महारक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात येते .
No comments:
Post a Comment