पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-२२फेब्रुवारी
खर्डा परिसरात फिरत असलेल्या व महादेवाला सोडलेल्या नंदी म्हणून ओळख असलेल्या बैलाच्या पाठीत कुऱ्हाड अडकलेल्या जखमी फिरत असलेबाबत खर्डा परिसरात सोशल मीडियावर फोटो व्हायरल झाला होता. काही नागरिकांनी सदर बैलाचा शोध घेऊन पाठीत अडकलेली कुऱ्हाड काढून त्यावर औषधोपचार करण्यात आले. याप्रकरणी दि. ८ फेब्रुवारी २०२४ रोजी अज्ञात आरोपी विरुद्ध भा.दं.वि कलम 428 प्राण्यांना क्रूरतेने वागवणे प्रतिबंध अधिनियम कलम 11 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. खर्डा शहर व परिसरातील जनतेमध्ये सदर कृत्य करणाऱ्या ईसमाबाबत तीव्र नाराजी होती. खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झंजाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्टेबल संभाजी शेंडे हे सदर गुन्हयाचा तपास करत असताना माहीती काढुन गुन्हयातील आरोपीचा शोध घेत गुन्ह्यात निष्पन्न आरोपी नामे गोरख नरहरी ढाळे, वय ४८ वर्षे, रा. खर्डा, ता. जामखेड यास ताब्यात घेण्यात आले आहे. सदर आरोपीनेही गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. सदर गुन्हयामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झंजाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्टेबल संभाजी शेंडे, पोलीस काॅन्स्टेबल शशीकांत म्हस्के, बाळासाहेब खाडे, अशोक बडे यांनी सदर ची कारवाई केली आहे.
No comments:
Post a Comment