पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-१७ फेब्रुवारी
खून करून फरार असलेल्या आरोपीच्या जामखेड पोलिसांनी अतिशय शिताफीने तपास करत बेड्या ठोकल्या आहेत .अटक केलेल्या आरोपीचे नाव महेंद्र सेवकराम महाजन असे आहे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दाखल गुन्ह्याचा तपास करत असताना पोलीस हेडकॉन्स्टेबल अजय साठे यांना गुप्त माहिती मिळाली की आरोपी महेंद्र सेवकराम महाजन आष्टी येथे त्याच्या गावी येणार आहे .माहितीची खात्री करून वरीष्ठ पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचून आरोपीला ताब्यात घेण्यात यश मिळविले .
याबाबत सविस्तर माहिती अशी की जामखेड पोलीस सन २०११ मध्ये बहुचर्चीत केरुळ ता. आष्टी जि बीड रवींद्र खाकाळ खुन प्रकरणातील पाच आरोपींना २०१८ मध्ये सत्र न्यायालय बीड जन्मठेपेची शिक्षा सुनावल्याने सदर आरोपी हे हरसुल कारागृह औरंगाबाद येथे शिक्षा भोगत असताना त्यातील आरोपी नामे महेंद्र सेवकराम महाजन रा केरुळ ता आष्टी जि बीड यास २०२० मध्ये कोरोना महामारीचे रजेवर सोडण्यात आले होते. रजा संपल्यानंतर सदर आरोपी याने हरसुल कारागृह औरंगाबाद येथे हजर न होता बेकायदेशीरपणे कारागृहाचे बाहेर राहील्याने हरसुल कारागृह औरंगाबाद यांनी २०२२ मध्ये जामखेड पोलीस स्टेशन गुरू नं ५२७ /२०२२ भादवी कलम २२४ प्रमाणे गुन्हा नोंद केला होता सदर गुन्ह्याचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल अजय साठे हे करत होते .आज दि.१७ फेब्रुवारी रोजी गुप्त माहीती मिळाली की आरोपी महेंद्र सेवकराम महाजन रा .केरुळ ता आष्टी जि बीड हा त्याचे गावी येणार असलेबाबत समजल्याने पोहेको साठे यांनी आष्टी येथील पोना जाधव यांना सदर माहीती देऊन आरोपीचा शोध घेण्याबाबत कळवीले असता सपोनी विजय नरवडे, पोना जाधव व इतरी स्टाफ यांनी केरुळ गावमध्ये शोध घेत असताना जामखेड पोलीस स्टेशन येथील पोहेकों अजय साठे, चापोहेको भगवान पालवे ,पोकों दिपक बोराटे असे सरकारी वाहनाने संयुक्त शोध घेत असताना फरार आरोपी नामे महेंद्र सेवकराम महाजन त्याचे घराजवळील शेतामध्ये असल्याबाबत माहीती समजल्याने आम्ही त्यास मोठ्या शिताफीने पकडून त्यास कडा पोलीस दुरक्षेत्र येथे घेऊन जाऊन त्यास सदर गुन्ह्याचे चौकशी कामी जामखेड पोलीस स्टेशन येथे आणले असून
सदरची कारवाई अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला , कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे यांचे आदेशानुसार पोलीस निरीक्षक महेश पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोहेकॉ अजय साठे, चापोहेको भगवान पालवे, पोना जितेंद्र सरोदे, पोकों दिपक बोराटे, प्रविण पालवे, दत्तु बेलेकर, सचिन पिरगळ व सर्व टीम यांनी ही शोध घेणे कामी मदत केली.
No comments:
Post a Comment