पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-/५ मार्च
जामखेड मध्ये घडलेल्या गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपी व त्याच्या साथीदाराच्या जामखेड मधून स्थानिक गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या आहेत.
अटक केलेल्या आरोपींचे नावे अक्षय उर्फ चिंग्या विश्वनाथ मोरे, वय (२०) रा. गरड पाटोदा .ता.जामखेड २) कुणाल जया पवार वय २२ रा.कान्होपात्रा नगर ,ता जामखेड
याबाबत सविस्तर माहिती अशी की जामखेड तालुक्यातील गरड पाटोदा येथे दिनांक 3 फेब्रुवारी रोजी रात्री एक वाजेच्या सुमारास पाटोदा गरड बस स्थानक जवळ जुन्या भांडणाच्या कारणावरून गोळीबार करून जीबी मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली होती.
याप्रकरणी आरोपीवर आर्म ॲक्ट सहजीवी मारण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील फिर्यादी आबेद बाबुलाल पठाण राहणार पाटोदा गरड तालुका जामखेड हे लेबर मुकादम असून त्यांचे कडील मजूर लक्ष्मण कल्याण काळे राहणार जामखेड यास आरोपी अक्षय उर्फ चिंग्या विश्वनाथ मोरे राहणार पाटोदा यांनी दीड वर्षांपूर्वी मारहाण केल्याने त्याच्या विरोधात जामखेड पोलिस स्टेशनला तक्रार नोंदवली होती त्याचाच राग मनात धरून दिनांक ३/३/२०२४ रोजी रात्री एक वाजेच्या सुमारास बस स्टॅन्ड जवळ आरोपींनी त्याच्या साथीदारांसोबत संगणमत करून फिर्यादीस शिवीगाळ करून जीवेत हार मारण्याची धमकी यातील फिर्यादी अमित बाबूलाल पठाण वय (४०) रा पाटोदा ग.ता. जामखेड . उद्देशाने त्याचे वर पिस्तुलने गोळ्या झाडल्याने फिर्यादीच्या उजव्या पायाला गोळी घालून दुखापत झाली होती. याबाबत जामखेड पोलीस स्टेशनला आर्म ऍक्टसह जीवे मारण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदरील घटनेचा स्थानिक गुन्हे शाखा समांतर तपास करत असताना दोन दिवस घटना ठिकाण व आजूबाचे सीसीटीव्ही फुटेजचे आधारे आरोपींची स्थानिक गुन्हे शाखेला माहिती मिळाली . सदरील आरोपी विंचरणा नदीपात्रा जवळील काटवनात जाऊन सापळा रचून जवळपास २ तास काटवनात शोध घेतला असता आरोपी नामे कुणाल जया पवार हा उसाचे शेतातून पळून जाताना दिसला त्यास ऊसाचे शेतातून ताब्यात घेण्यात आले.
सदरील कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला , अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे , उपविभागीय अधिकारी विवेकानंद वाखारे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर , पोसई तुषार धाकराव व अमलदार बापूसाहेब फुलाने , रविंद्र कर्डिले ,विश्वास बेरड, विशाल दळवी ,रोहित मिसाळ, बबन मखरे , देवेंद्र शेलार , विजय , ठोंबरे प्रमोद जाधव , मेघराज कोल्हे ,रणजीत जाधव ,प्रशांत राठोड , उमाकांत गावडे , व भरत बुद्धवंत पथक नेमून कारवाई करण्यात आली
आरोपी नामे अक्षय ऊर्फ चिंग्या विश्वनाथ मोरे हा सराईत गुन्हेगार असुन त्याचे विरुध्द खुन, खुनाचा प्रयत्न व गंभीर दुखापत असे एकुण 5 गुन्हे दाखल आहेत ते खालील प्रमाणे -
अ.क्र. पोलीस स्टेशन गु.र.नं. व कलम
1. जामखेड 55/2018 भादविक 307,308,324,143,आर्म 3/25
2. जामखेड 75/2018 भादविक 302,120(ब),143,147,सह आर्म 3/25
3. जामखेड 96/2018 भादविक 143,147,148,149 आर्म 3/25,74
4. जामखेड 492/2022 भादविक 307,324,323,143,147,149 आर्म ऍ़क्ट 3/25 सह अजाज
5. जामखेड 122/2023 भादविक 385,324,336,143,147,149
आरोपी नामे कुणाल जया पवार हा सराईत गुन्हेगार असुन त्याचे विरुध्द जबरी दुखापत व गंभीर दुखापत असे एकुण 2 गुन्हे दाखल आहेत ते खालील प्रमाणे -
अ.क्र. पोलीस स्टेशन गु.र.नं. व कलम
1. जामखेड 380/2022 भादविक 387, 363, 323, 504, 506
जामखेड 545/2019 भादविक 324, 323, 337, 143, 147, 504, 506
No comments:
Post a Comment