अवधूत गुप्तेंच्या भन्नाट गाण्यांवर खा.सुजय विखे आणि माजी मंत्री शिवाजी कर्डीलेही थिरकले!! महिलांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी आणि खा. विखेंच्या हस्ते कर्तृत्ववान महिलांचा सन्मान - police warrant kharda

police warrant kharda

संपादिका -श्वेता बापूसाहेब गायकवाड-9970529697 / कार्यकारी संपादक- आशुतोष गायकवाड- 8888785253,

🚨 पोलिस वॉरंट न्यूजवर आपले सहर्ष स्वागत आहे 🚨 ताज्या घडामोडी | स्थानिक व राष्ट्रीय बातम्या | शैक्षणिक माहिती | सामाजिक प्रश्न आपल्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा... धन्यवाद 🙏

  • Home
  • शिक्षण
  • राजकीय
  • रक्तदान
  • ठळक बातम्या
  • जामखेड शहर
  • खर्डा शहर
  • कर्जत-जामखेड
  • आरोग्य

Breaking

शुक्रवार, ८ मार्च, २०२४

Home राजकीय बातम्या अवधूत गुप्तेंच्या भन्नाट गाण्यांवर खा.सुजय विखे आणि माजी मंत्री शिवाजी कर्डीलेही थिरकले!! महिलांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी आणि खा. विखेंच्या हस्ते कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

अवधूत गुप्तेंच्या भन्नाट गाण्यांवर खा.सुजय विखे आणि माजी मंत्री शिवाजी कर्डीलेही थिरकले!! महिलांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी आणि खा. विखेंच्या हस्ते कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

शुक्रवार, मार्च ०८, २०२४ राजकीय बातम्या,


पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-८ मार्च

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत भाजप खा.डॉ.सुजय विखे पाटील यांच्या संकल्पनेतून आणि जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील विविध तालुक्यांत सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी दिली जात आहे.  कला,मनोरंजन, गायन,संगीत क्षेत्रातील नामवंत सेलिब्रेटींच्या उपस्थितीत होत असल्याने या सर्व कार्यक्रमांना महिलावर्गाची जबरदस्त गर्दी दिसून येत आहे. अगदी शालेय मुली, कॉलेज युवतींपासून लग्न झालेल्या महिला, मुलं-नातवंड असलेल्या आजीबाईंपर्यंत या रंगारंग कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेताना दिसून येत आहे. 

याबाबत बोलताना फाउंडेशनच्या धनश्री विखे आणि खा.सुजय विखे यांनी सांगितले की, भारतीय समाजात घरामध्ये स्त्री ला निश्चितच मानाचे आणि आदराचे स्थान दिले जाते. अनेक युवती-महिला शिक्षण आणि त्यांच्यातील कलागुण कौशल्याने नोकरी-व्यवसायात स्थिरावत असल्या तरी एकूणच स्त्रीला आजही घरातील सर्व कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे सार्वजनिक जीवनात घेता येईल असा मनोरंजन, छंद आदींचा आनंद घेता येत नाही. घरातील कामांची व्यस्तता आणि समाज काय म्हणेल म्हणून महिलांची व्यक्ती म्हणून घुसमट होत असते. त्यामुळे आम्ही महिला दिनाचे औचित्य साधून सर्व घटकांतील युवती-महिलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. इतर कोणी मंडळी कार्यक्रम घेताना वेग वेगळे इप्सित डोळ्यासमोर ठेवून कार्यक्रम घेत असतील, मात्र आम्ही जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून कुठलाही राजकीय हेतू डोळ्यासमोर न ठेवता आणि याची उगाच जास्तीची प्रसिद्ध न करता केवळ महिलांच्या मनाचा विचार करून त्यांच्या जीवनात आनंदाचे क्षण पेरण्याच्या हेतूने कार्यक्रम घेत आहोत. विशेष म्हणजे आम्ही आयोजित केलेल्या कार्यक्रमांना महिला,युवतीं बरोबर अगदी नातू-पणतू असलेल्याआजीबाई देखील आवर्जून उपस्थिती लावत आहेत हे आमच्या कार्यक्रमांचे यश असल्याचे धनश्री विखे म्हणाल्या.

शेवगाव, पाथर्डी,कर्जत,जामखेड नंतर राहुरी इथे आयोजित कार्यक्रमास तर रेकॉर्डब्रेक गर्दी झाल्याचे दिसून आले. असंख्य महिलांची उपस्थिती, प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आणि दिलखेचक लावणी नृत्यासाठी ओळख निर्माण केलेल्या मानसी नाईक यांचे प्रेक्षकांवर भुरळ घालणारे नृत्य, प्रसिद्ध धम्माल गायक, परीक्षक अवधूत गुप्ते यांचा प्रेक्षकांची मने जिंकणारा आवाज, महिलांसाठी पैठणीसह विविध आकर्षक बक्षिसांची लयलूट आणि खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी कर्तृत्ववान महिलांचा केलेला सन्मान असा अनोखा आणि दैदिप्यमान सोहळा काल राहुरी येथे मोठ्या उत्साहाच्या वातावरणात आणि रेकॉर्ड ब्रेक गर्दीसह संपन्न झाला. 

जनसेवा फाउंडेशन च्या माध्यमातून काल राहुरी येथील केशर मंगल कार्यालय,(मल्हारवाडी रोड) येथे महिला दिनाच्या अनुषंगाने कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा व सांस्कृतिक महोत्सव 2024 चे आयोजन करण्यात आले होते. माजीमंत्री शिवाजीराव कर्डिले आणि धनश्री विखे पाटील यांची सदरील कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमात महिलांच्या गर्दीने परिसर अगदी फुलून गेला होता. दरम्यान विविध क्षेत्रात आपले बहुमूल्य योगदान देऊन आपल्या कार्याचा ठसा उमटविणाऱ्या महिलांचा सन्मान खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. सन्मानित करण्यात आलेल्या महिलांकडून सर्वांनी प्रेरणा घेऊन त्यांच्या पायावर पाय ठेवत वाटचाल करावी असे आवाहन सुजय विखेंनी उपस्थित महिलांना केले.

या सांस्कृतिक महोत्सवात महिलांचे मनोरंजन करण्याच्या अनुषंगाने विविध कार्यक्रम राबविण्यात आले. भव्य लकी ड्रॉ स्पर्धा आयोजित करून महिलांना पैठणीसह विविध आकर्षक बक्षिसे देण्यात आली. तसेच दिग्गज कलाकार, जसे की अवधूत गुप्ते यांनी आपल्या गोड आवाजात आणि मानसी नाईक यांनी आपल्या नृत्याविष्कार सादर करून प्रेक्षकांना खिळवून ठेवले.

या कार्यक्रमात राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शशिकलाताई पाटील, शेती व व्यवसाय क्षेत्रातील पुष्पलताताई येवले, वैद्यकीय क्षेत्रातील डॉ. दिपा कुसळकर, 32 वर्षांपासून ईश्वरीय सेवेत असणाऱ्या ब्रह्मशांती पद्मादेवी, कृषी क्षेत्रातील कविता जाधव, वैद्यकीय क्षेत्रातील श्रीम. डॉ. केतन साळवे, अध्यात्मिक कार्य करणाऱ्या ह.भ.प. वंदना आंधळे, क्रीडा व कृषी क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या ज्योती खेडेकर/ धामोरे, दुग्ध व्यवसाय क्षेत्रातील ज्योती शिंदे, क्रीडा व राजकीय क्षेत्रातील सोनाली बर्डे, सामाजिक कार्यकर्त्या सविता मगर, फोटोग्राफी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या काजल शर्मा, बालक संगोपन सेवा क्षेत्रातील सखुबाई जाधव, उद्योजिका रोहिणी कुसमुडे, बचत गट संघटन करणाऱ्या उमा जैन, शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या वंदना कांडेकर, बचत गट क्षेत्रात कार्य करणाऱ्या वैशाली धसाळ, अध्यात्मिक कार्य करणाऱ्या ह.भ.प. सोनालीताई गावडे/ तागड, शैक्षणिक क्षेत्रातील प्रमिला ढोकणे आदी कर्तृत्ववान महिलांना यावेळी सन्मानित करण्यात आले.
 
चौकट
रेकॉर्ड ब्रेक गर्दी..
जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून राहुरी येथे आयोजित कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा आणि सांस्कृतिक महोत्सव 2024 साठी प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली होती. गेल्या आठवडाभरात वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये सुरू असलेल्या या महोत्सवाला जी गर्दी पाहायला मिळाली त्यापेक्षा अधिक गर्दी कालच्या या भव्य सोहळ्यात दिसून आली. खरंतर हा एक ऐतिहासिक आणि अविस्मरणीय असा क्षण होता..

चौकट:
-आपल्या खास धमाल गाण्यांच्या शैलीसाठी प्रसिद्ध असलेले अवधूत गुप्ते यांनी गायलेल्या गाण्यांवर गुप्ते यांनी खा.सुजय विखे यांना नाचायला भाग पाडलेच. आपल्या अवखळ स्वभावामुळे अवधूत गुप्ते कार्यक्रमात मोठी रंगत आणतात. अरे दिवानो, मुझे पाहचानो..  में हु डॉन.. या गाण्यावर खा.सुजय विखे चांगलेच नाचले. यावेळी समर्थक चाहत्यांनी खा.विखे आणि माजीमंत्री कर्डीले यांनी खांद्यावर घेत नाचत एकच जल्लोष केला. यावेळी काळा गॉगल घालून कर्डीले आणि विखे यांनीही खांद्यावर नाचत गाण्याचा आनंद घेतला.
Tags # राजकीय बातम्या
  • Tweet
  • Share
  • Pin it
  • Comment
  • Whatsapp
Author Image

About Unknown

राजकीय बातम्या
Posted at शुक्रवार, मार्च ०८, २०२४
यास ईमेल कराहेब्लॉगकरा!X वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा
Labels राजकीय बातम्या

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

नवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)
श्वेता बापूसाहेब गायकवाड संपादिका-सा.पोलीस वारंट मो नंबर-९९७०५२९६९७

श्वेता बापूसाहेब गायकवाड संपादिका-सा.पोलीस वारंट मो नंबर-९९७०५२९६९७

Blogger द्वारे प्रायोजित.

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क

संपादिका -श्वेता बापूसाहेब गायकवाड-9970529697 / कार्यकारी संपादक- आशुतोष गायकवाड- 8888785253,

Popular Posts

  • ब्रेकिंग न्यूज: खर्डा येथील आत्महत्या प्रकरण उघडकीस; कर्जाच्या वसुलीसंदर्भातील तणावामुळे व्यक्तीने घेतला गळफास, दोघांना अटक, एक आरोपी फरार
    खर्डा प्रतिनिधी/८ सप्टेंबर २०२५ खर्डा (ता. जामखेड) येथे कर्ज दिलेल्या पैशांची परतफेड न करताच उलट धमक्या दिल्याचा त्रास सहन न...
  • ब्लॅकमेलिंगच्या त्रासातून फार्मसिस्ट तरुणीची धक्कादायक आत्महत्या, सुन्न करणारी सुसाईड नोट उघडकीस
    आहिल्यानगर प्रतिनधी/9सप्टेंबर2025 22 वर्षीय फार्मसिस्ट तरुणीने ब्लॅकमेलिंगच्या मानसिक तणावातून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्...
  • कलाकेंद्र वादातून थेट तरुणावर धाडकन घातली गोळी; पुन्हामहाराष्ट्रात खळबळ!
    सोलापूर प्रतिनधी/12सप्टेंबर2025 सोलापूर जिल्ह्यात सलग दोन दिवसांत घडलेल्या धक्कादायक घटनांनी संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले आहे. वै...
  • "खर्डा हद्दीतील मोहरी तलाव फुटण्याची भीती – नागरिकांनी सतर्कता बाळगावी"
    खर्डा प्रतिनधी/२२सप्टेंबर२०२५ जामखेड तालुक्यातील खर्डा हद्दीतील मोहरी तलाव फुटण्याची गंभीर शक्यता निर्माण झाली आहे. काल रात्री...
  • मोठी बातमी: अवैध वसुलीचा व्हिडीओ व्हायरल; शेंडी बायपासवर ट्रकचालकांकडून पैसे घेताना पोलीस निलंबित
    अहिल्यानगर (दि. ११ सप्टेंबर) –  आहिल्यानगरमधिल शेंडी बायपास परिसरात ट्रकचालकांकडून अवैधरित्या पैसे गोळा करणाऱ्या प्रकरणाचा व्ह...
  • धक्कादायक: “लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर वारंवार अत्याचार;मुलगी झाल्यावर आरोपीचा जबाबदारीला नकार ; खर्डा शहर हादरले” आरोपीविरुद्ध पोलिसात गंभीर गुन्हा दाखल
    खर्डा प्रतिनिधी/१८ सप्टेंबर २०२५ अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील खर्डा परिसरात, लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीशी वारंवा...
  • जामखेड बसस्थानकाजवळ बेवारस मृतदेह सापडला, संजय कोठारी यांनी पोलिसांना दिली माहिती ,परिसरात खळबळ
    जामखेड प्रतिनधी/8सप्टेंबर2025 जामखेड येथील बसस्थानकावरील शेडमध्ये एका अंदाजे ७५ वर्षीय अज्ञात व्यक्तीला बेशुद्ध अवस्थेत पडलेले प...
  • ब्रेकिंग न्यूज : अवैध धंद्यावाल्यांचे धाबे दणाणलेखर्डा हद्दीत स्थानीक गुन्हे शाखेचा छापा, तिरट जुगार अड्ड्यांवर ४० जण ताब्यात; लाखोंचा मुद्देमाल जप्त
    खर्डा प्रतिनधी/सप्टेंबर2025 अहिल्यानगर जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कारवा...
  • ५ लाख रुपयांच्या बनावट नोकरी फसवणुकीचा खर्डा पोलिसांकडून पर्दाफाश;२ वर्षे फरार आरोपी मुरलीधर नेटके नवी मुंबईतून अटक
    खर्डा प्रतिनधी/१७सप्टेंबर२०२५ खर्डा पोलीसांनी नोकरीचे आमिष दाखवून ५ लाख रुपयांची फसवणूक करणा-या फरार आरोपी मुरलीधर धर्मा नेटके र...
  • अल्पवयीन मुलीवर अत्याचार; गावातून अपहरण करून पनवेलला नेले, मुख्य आरोपी अटकेत! परिसरात खळबळ!
    जामखेड प्रतिनिधी / ५ ऑक्टोबर २०२५ आष्टी तालुक्यातील एका गावातून १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने चारचाकी वाहनातून उचलून तिच...

Popular Posts

मोहरी तलाव दुरुस्तीवरून भाजप-राष्ट्रवादी आमनेसामने; श्रेयवादाच्या वादानं रंगला खर्ड्यात कलगीतुरा!

चाकूचा धाक दाखवून कामगाराची लूट; दोन सराईत लुटारूंना पोलिसांच्या बेड्या

समाजसेवेचा दीप उजळला — पै. सागर भाऊ टकले यांच्याकडून वॉर्ड क्र.11 मधील महिलांना दिवाळीनिमित्त किराणा किटचे वाटप,नगरसेवक असावा तर सागर भाऊ सारखा!” – दिवाळीत महिलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवला , महिलांनी केलं आभार प्रदर्शन

लोणीचे आदर्श सरपंच रघुनाथ परकड आता पंचायत समितीच्या निवडणुकीच्या रिंगणात,राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार प्राप्त; भाजपातून साकत गणातून उमेदवारीसाठी इच्छुक

निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजीत कासले पोलीस सेवेतून बडतर्फ

जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर पालकमंत्र्यांचा दणका: निर्भयपणे अवैध धंद्यांवर कारवाई करण्याची मोहीम सुरू करा- राधाकृष्ण विखे पाटील

मोठी बातमी :स्थानिक गुन्हे शाखेचे धडाकेबाज कामगिरी! जामखेडमध्ये गोळीबार करणारे 6 आरोपी 24 तासाचे आत जेरबंद

जामखेड: पाळीव जनावरे नागरिकांनी मोकाट सोडू नये अन्यथा नगरपरिषदेच्या वतीने कडक कारवाई करण्यात येणार - मुख्याधिकारी अजय साळवे

जामखेडमध्ये शांतता सुरक्षिततेसाठी श्री नागेश्वर यात्रेपूर्वी शांतता समिती बैठक संपन्न

खर्डा येथे पिकअपमध्ये कत्तलीसाठी जनावरांची वाहतूक करणारा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

Labels

  • अरणगाव (2)
  • अहमदनगर (8)
  • अहमदनगर बातम्या (1)
  • अहमदनगर पोलीस (1)
  • अहमदनगर पोलीस स्टेशन (2)
  • अहमदनगर शहर (3)
  • अहिल्यानगर पोलीस (1)
  • आरोग्य (1)
  • आहिल्यानगर पोलीस (2)
  • आहिल्यानगर पोलीस स्टेशन (1)
  • आहिल्यानगर बातम्या (1)
  • कर्जत (2)
  • कर्जत -जामखेड (1)
  • कर्जत पोलीस स्टेशन (1)
  • कर्जत-जामखेड (24)
  • केज पोलीस स्टेशन (1)
  • क्राईम (18)
  • क्राईम न्यूज (1)
  • क्राईम बातम्या (115)
  • खर्डा (1)
  • खर्डा ग्रामपंचायत (1)
  • खर्डा पोलीस स्टेशन (128)
  • खर्डा प्रतिनधी (1)
  • खर्डा शहर (331)
  • खर्डा शहर ठळक (1)
  • चोंडी (2)
  • चौंडी (1)
  • जवळा (1)
  • जातेगाव (2)
  • जामखेड (3)
  • जामखेड ठळक (2)
  • जामखेड पोलीस स्टेशन (176)
  • जामखेड शहर (175)
  • जामखेड शहर बातम्या (1)
  • जिल्हाधिकारी बातम्या (1)
  • ठळक बातम्या (429)
  • डोणगाव बातम्या (1)
  • तेलंगशी बातम्या (1)
  • थळक बातम्या (1)
  • दिघोळ बातम्या (1)
  • दुःखद बातम्या (11)
  • धानोरा ग्रामपंचायत (1)
  • नगर (1)
  • नगर पोलीस स्टेशन (1)
  • नायगाव (2)
  • नेवासा पोलीस स्टेशन (11)
  • नेवासा बातम्या (2)
  • नेवासा शहर (2)
  • पर्यावरण (1)
  • पोलीस स्टेशन (1)
  • बांधखडक (2)
  • बांधखडक बातम्या (2)
  • बातम्या (8)
  • बावी (2)
  • बाळगव्हाण (3)
  • बीड क्राईम बातम्या (1)
  • बीड पोलीस स्टेशन (5)
  • बीड शहर (2)
  • भूम बातम्या (1)
  • मिरजगाव पोलीस स्टेशन (2)
  • मोहरी बातम्या (1)
  • रक्तदान (1)
  • राजकीय (86)
  • राजकीय ठळक (6)
  • राजकीय ठळक बातम्या (1)
  • राजकीय बातम्या (362)
  • लोणी ग्रामपंचायत (1)
  • शहर ठळक बातम्या (3)
  • शालेय (5)
  • शालेय बातम्या (1)
  • शिर्डी पोलीस स्टेशन (2)
  • शिर्डी बातम्या (1)
  • शिक्षण (1)
  • शैक्षणिक (2)
  • शैक्षणिक बातम्या (45)
  • साकत (6)
  • साकत बातम्या (1)
  • सातेफळ (1)
  • सामजिक बातम्या (33)
  • सामाजिक (23)
  • सामाजिक ठळक (1)
  • सामाजिक बातम्या (104)
  • सोनेगाव (7)
  • सोलापूर ठळक बातम्या (1)
  • स्थानिक गुन्हे शाखा (33)
  • स्थानिक गुन्हे शाखा नगर (1)
  • स्थानीक गुन्हे शाखा (3)
  • हळगाव (2)
  • dysp संतोष खाड़े (1)
  • Vote (1)

पोलीस वारंट समाजातील प्रत्येक घटकांच्या घडामोडी, कला आणि साहित्य क्षेत्रातील उत्तुंग भरारी, खेळ आणि क्रीडा विश्वातील यशस्वी दौड, शिक्षण व शैक्षणिक वाटचाल, राजकारण आणि सामाजिक माहिती, गुन्हेगार आणि समाजातील विकृती, जनजागृती आणि जनसामान्यांच्या भावना आपल्या लेख, कथा, काव्य, गोष्टी, व बातम्यांच्या माध्यमातून समाजापुढे मांडत असते.

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

POLICE WARRANT ©2023 All rights reserved Developed By DIGITAL FLY KHARDA

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *