पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-८ मार्च
जामखेड तालुक्यातील खर्डा पोलीस स्टेशन हद्दीतील पिंपळगाव उंडा येथे आपल्या शेतातून ट्रॅक्टर घेऊन जाण्यास विरोध केल्याने एकाने ट्रॅक्टर अंगावर घालून जखमी केलेल्या वयोवृद्ध शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून याप्रकरणी आरोपी शिवाजी भरत ढगे याच्यावर खुणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपीस खर्डा पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेले माहितीनुसार दिनांक 28 फेब्रुवारी रोजी घटनेतील फिर्यादी हनुमंत भगवान ढगे वय (७३) रा. पिंपळगाव गुंडा हे त्यांच्या पिंपळगाव उंडा गावच्या शिवारामधील शेतात असताना त्यांचा पुतण्या व घटनेतील आरोपी शिवाजी भरत ढगे वय (४२)रा. पिंपळगाव उंडा यांच्यात शेतावरून वाद असल्याने आरोपी शिवाजी भरत ढगे हा त्याचा महेंद्र कंपनीचा ट्रॅक्टर MH - 16- AM5659 यास मळणी यंत्र जोडलेल्या ट्रॅक्टरसह शेतामधून घेऊन जात असताना फिर्यादी हनुमंत भगवान ढगे हे म्हणाले की आमच्या शेतामधून ट्रॅक्टर घेऊन जाऊ नको ट्रॅक्टर घेऊन जाण्यास विरोध केल्याने त्यांच्यात शाब्दिक चकमक होऊन आरोपी शिवाजी ढगे यांनी त्याच्या ताब्यातील ट्रॅक्टरने फिर्यादीस धडक देऊन ट्रॅक्टर पायावर घालून त्यांना गंभीर जखमी केले होते. फिर्यादी पुणे येथील डी वाय पाटील हॉस्पिटल येथे उपचार घेत असताना मयत झाले त्यामुळे आरोपीविरुद्ध भा.द. वि. कलम 302 प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्यातील आरोपी शिवाजी भरत ढगेला अटक करून वापरलेले महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर या तपासात जप्त करण्यात आला आहे.
सदरची कारवाई ही पोलिस अधीक्षक राकेश ओला ,अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे , उपविभागीय पोलिस अधिकारी कर्जत विवेकानंद वाखारे यांच्या मार्गदर्शनाखाली खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झंजाड़, पोलीस हेडकॉन्स्टेबल संभाजी शेंडे, शशिकांत मस्के , बाळू खाडे ,अशोक बडे ,महिला पोलीस कॉन्स्टेबल अनुराधा घोगरे , आयोध्या पोकळे यांनी केली आहे . पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झंजाड़ करत आहेत.
No comments:
Post a Comment