पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-८ मार्च
जामखेड तालुक्यातील रत्नापूर शिवारात असलेल्या रत्नदीप मेडिकल फौंडेशनचे अध्यक्ष डॉ. भास्कर मोरे यांनी आपल्याच कॉलेज मधील एका २० विद्यार्थीनीस कॉलेजच्या वर्षीय प्रिन्सिपल ऑफिसचे अँटी चेंबर मध्ये तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून विनयभंग केल्याप्रकरणी सदर पिढी तिने दिलेल्या फिर्यादयावरून डॉक्टर भास्कर मोरे वर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे यामुळे पुन्हा एकदा डॉक्टर भास्कर मोरेचे कुकृत्य समाजापुढे आले आहे.
डॉ . भास्कर मोरे हे रत्नदीप मेडिकल फाउंडेशन चे अध्यक्ष असून त्यांना कॉलेज व्यवस्थापनात हस्तक्षेप करण्याचा कोणताही अधिकार नसताना ते हस्तक्षेप करत तेथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची शारीरिक मानसिक व आर्थिक पिळवणूक करत असतात मात्र आपले शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून मुलं त्या दबावाखाली सर्व अन्याय सहन करत असतात मात्र या अत्याचाराचा कहर झाल्याने रत्नदीप मेडीकल कॉलेजचे अध्यक्ष डॉ. भास्कर मोरे यांच्याकडून विद्यार्थ्यांचे आर्थिक व मानसिक शोषण होत असून याबाबत योग्य ती कारवाई करावी व आम्हाला न्याय द्यावा यासाठी फार्मसीचे तब्बल २६८ विद्यार्थी व विद्यार्थिनींनी मेडिकल कॉलेज पासून तीन किलोमीटर मोर्चाने येत तहसील पोलीस स्टेशन समोर ठिया आंदोलन केले.
हे आंदोलन आज चौथ्या दिवशीही सुरूच असून तालुक्यातील मनसे ,शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान , संभाजी ब्रिगेड , राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार , आम आदमी पार्टी ,भाजपा आणि विविध पक्ष संघटनांनी या आंदोलनास पाठिंबा दिला आहे. तसेच प्रशासनाने ही उशिरा का होईना पण योग्य दखल घेत अखेर या विद्यार्थ्यांना न्याय देण्याची तयारी दाखवली व भूमिका घेतली.
दिनांक ७ मार्च रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे , उपविभागीय अधिकारी नितीन पाटील यांनी आंदोलन स्थळी भेट दिली व प्रशासनाला योग्य त्या सूचना दिल्या. मुलींवर अन्याय अत्याचार करणाऱ्या वर गुन्हा दाखल करण्यात येणार असे पत्रकारांशी बोलताना उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे यांनी सांगितले होते. तसेच मुलींच्या तक्रारीसाठी महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षा जाधव यांची नियुक्ती केली होती. तसेच उपविभागीय अधिकारी सायली सोळंके , तहसीलदार गणेश माळी ,पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी आंदोलनकर्त्यांना सहकार्य करण्याची भूमिका घेतली.
दरम्यान विद्यार्थीची भूमिका समजावून घेत वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली व सदर पीडित २० वर्षे फिर्यादीने दिलेल्या फिर्यादी वरून दिनांक 8 मार्च 2024 च्या पहाटे आठ वाजता नराधम डॉ. भास्कर मोरे विरुद्ध गु. रजी नं.104/2024 IPC 354 ,354 अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षा जाधव या करत आहेत.
No comments:
Post a Comment