पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-८ मार्च
मुलींच्या ज्या तक्रारी आहेत महिला सह्ययक पोलीस निरीक्षक नेमून त्यांच्याकडे मुलींच्या तक्रारी ऐकून घेऊन गुन्हे दाखल करू आणि कारवाई करू . मुलींवर अन्याय अत्याचार करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस उपधीक्षक विवेकानंद वाखारे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितली आहे.
याबाबत सविस्तर असे की काल दि .७ मार्च रोजी रत्नदीप मेडिकल फाउंडेशन चे अध्यक्ष डॉ. भास्कर मोरे यांच्या मनमानीला कंटाळून जामखेड येथे गेल्या तीन दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. व त्याच पार्श्वभूमीवर काल जामखेड येथे तहसील कार्यलयासमोर मेडिकल कॉलेज मधील विद्यार्थी संघटना व पक्षांच्या वतीने डॉ. भास्कर मोरे यांच्याकडून होणाऱ्या अन्यायाविरुद्ध बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे.
यावेळी पोलीस अधीक्षक विवेकानंद वाखारे , उपविभागीय अधिकारी नितीन पाटील यांनी उपोषणस्थळी भेट देऊन विद्यार्थी , विद्यार्थी ,विद्यार्थिनींचे प्रश्न व मागण्या जाणून घेतल्या. व मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. रत्नदीप मेडिकल कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष डॉ. भास्कर मोरे यांच्याकडून विद्यार्थी मुले व मुली यांची प्रचंड आर्थिक ,मानसिक , शारीरिक ,पिळवणूक करत असल्याची माहिती यावेळी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी पोलीस उपधीक्षक विवेकानंद वाखारे व उपविभागीय अधिकारी नितीन पाटील यांना सांगितली असून आमचे पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर गुन्हे दाखल करून भास्कर मोरे यांना अटक करण्यात यावी . व जर असे केले नाही तर आम्ही आमरण उपोषण करणार असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले .विद्यार्थ्यांनी व शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानचे तालुकाध्यक्ष पांडू राजे भोसले व आरपीआय जिल्हा अध्यक्ष सुनील साळवे यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या .
यावेळी उपविभागीय अधिकारी नितीन पाटील म्हणाले पोलीस प्रशासन तुमच्यासोबत आहे. आम्ही येथे चर्चा करून मार्ग काढण्यासाठी आलेलो आहोत.काल तहसीलदार गणेश माळी यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ,आरोग्य विज्ञान विध्यापीठ आणि बार्टी विद्यापीठ तिघांना पत्र लिहीलेलं होत तहसिलदार त्याच्यानुसार कुलगुरु महोदयांशी बोलले सुद्धा आहेत. त्यांनी एक समिती स्थापन केलेली आहे तीन सदस्य ह्या समितीमध्ये आहेत. तीन सदस्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली त्याच्यामध्ये डॉ. संदीप पालवे अध्यक्ष आहेत . डॉ. बाळासाहेब सागडे आणि डॉ .जी.वाय दामा आहेत. असे तीनजण आहेत ज्यांना कुलगुरूंनी आदेश दिले आहेत तात्काळ आपली हजेरी द्यावी म्हणून हे उध्या सकाळपर्यंत आपल्या भेटीली येणार आहेत व आपल्याशी ते चर्चा करणार आहेत.तुमच्या शैक्षणिक तक्रारी तुम्ही ह्या समितीकडे मांडू शकताय. तक्रार करु शकताय . व तुमचा जो दुसरा मुद्दा आहे हरेसमेंटचा त्याबद्दल पोलीस उपधीक्षक विवेकानंद वाखारे , पोलीस निरीक्षक महेश पाटील व मी चर्चा केली आहे. त्या बाबी खरोखर गंभीर आहेत पण हे करण्याकरिता तुम्ही पण पोलीस प्रशासणाला सहकार्य केले पाहिजे. पोलीस प्रशासन तुमच्या सोबत आहे. मी म्हणत नाही तुम्ही उपोषण थांबवा पण उपोषण तुम्ही स्थगित करा विध्यापिठ कमिटीला येऊ द्या , त्यांच्यासमोर सगळे जाबजबाब होऊ द्या त्याच्यानंतर त्यांना निर्णय घेऊ द्या , कायदेशीर प्रशासकीय बाबींना आपण सर्वांनी सहकार्य केले पाहिजे.गुन्हा दाखल होणार पण प्रशासणाला सहकार्य केले पाहिजे . असे प्रतिपादन उपविभागीय अधिकारी नितीन पाटील यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना केले.
यावेळी उपस्थित पोलीस उपधीक्षक विवेकानंद वाखारे ,उपविभागीय अधिकारी नितीन पाटील ,पोलीस निरीक्षक महेश पाटील, तहसीलदार गणेश माळी , शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानचे तालुकाध्यक्ष पांडू राजे भोसले, आरपीआय जिल्हा अध्यक्ष सुनील साळवे, मनसेचे तालुकाध्यक्ष प्रदीप टापरे ,भाजपा युवा मोर्चा बाजीराव गोपाळघरे , माजी सभापती भगवान मुरूमकर आणासाहेब सावंत ,हवा सरनोबत, रमेश आजबे , प्रहारचे जयसिंग उगले ,संतोष नवलाखा ,गणेश घायतडक ,स्वप्नील खाडे, यांच्यासह उपोशनकर्ते विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment