पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-९ मार्च
रत्नादीप मेडिकल फाउंडेशन अध्यक्ष डॉक्टर भास्कर मोरे यांच्या विरुद्ध मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी व विद्यार्थिनींनी गेले चार दिवसांपासून सुरू केलेले आंदोलनाला आज मोठी यश आले आहे काल दिनांक ८ मार्च रोजी आंदोलनाच्या चौथ्या दिवशी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या त्रिसदस्य सत्यशोधन पथकाने जामखेडला भेट दिली रत्नदीप मेडिकल कॉलेज मधील आंदोलन विद्यार्थ्यांची संवाद साधला त्यांच्या तक्रारी जाणून घेतल्या त्यानंतर या पथकाने शुक्रवारी सायंकाळी रत्नदीप मेडिकल कॉलेज वर जाऊन वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी केलेल्या तपासणीत विद्यार्थ्यांनी केलेल्या तक्रारी तथ्य आढळले तसेच अनेक गोष्टी संशयास्पद आढळले त्यामध्ये कॉलेजला कायमस्वरूपी प्राचार्य नाहीत ,शिक्षक स्टाफ नाही ,हजेरी नाही ,कागदपत्रे नाहीत ,ज्या क्लास रूममध्ये क्लास भरतो तिथे अनेक दुसरे क्लास भरतात, कॉलेज ग्रंथालय ,लॅब ,कॅन्टींग या ठिकाणी अनेक मटेरियल एक्सपायर झालेले आढळले. सकाळी वेगळा वर्ग ,दुपारी फार्मसी ,सायंकाळी वेगळा क्लास एकच रूममध्ये भरतो. अनेक साहित्य असे आढळले ते वापरता येत नाही. तेव्हा सर्व सदस्यांच्या एकमताने फार्मसी लॅब सह इतर सहा लॅबला सील करण्यात आले आहे.
ही कारवाई विद्यापीठाचे डॉक्टर संदीप पालवे, जी .वाय.दामा ,डॉ.अमोल घोलप या तीन सदस्य सत्यशोधन समितीने केली आहे. यावेळी तहसीलदार गणेश माळी , पोलीस निरीक्षक महेश पाटील , नायब तहसीलदार महेश अनारसे ,तसेच आंदोलन विद्यार्थी उपस्थित होते.
सत्यशोधन समिती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला आजच्या चौकशीचा आणि कारवाईचा प्राथमिक अहवाल तातडीने सोपवणार आहोत. आम्ही दुसरा अहवाल सादर करताना अत्यंत बारकाईने प्रत्येक गोष्टींचा समावेश करणार आहोत . विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय दूर केला जाणार आहे .अशी माहिती सत्यशोधन समितीचे अध्यक्ष डॉक्टर संदीप पालवे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.
No comments:
Post a Comment