पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-९ मार्च
रत्नदीप मेडिकल फौडेशन अँड रिसर्च सेंटर रत्नापुर ता. जामखेड जिल्हा अहमदनगर येथील विद्यार्थी व विद्यार्थ्यांची संस्थापक अध्यक्ष डॉ. भास्कर याच्याकडून होत असलेल्या आर्थिक, मानसीक व शारीरिक छळास कंटाळून उद्विग्न झालेल्या मुला मुलींच्या आमरण उपोषणास संभाजी ब्रिगेडने जाहीर पाठिंबा दिला आहे.
तसेच आमरण उपोषणात प्रत्यक्ष सहभागी झालो असल्याची माहिती संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष आण्णासाहेब सावंत यांनी दिली आहे.
याबाबत संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष आण्णासाहेब सावंत यांनी मुख्यमंत्री व जामखेडचे तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की रत्नदीप मेडिकल फौंडेशन या संस्थे मध्ये BAMS, BHMS, D Farm, B Farm, M Farm, Narsing असे अभ्यासक्रम शिकवले जातात. या सर्व शिक्षणासाठी राज्याच्या व देशाच्या कानकोपऱ्यातून शेकडो मुल – मुलींनी प्रवेश घेतलेला आहे. या संस्थेचा अध्यक्ष डॉ भास्कर मोरे हा मुला मुलींची वारंवार आर्थिक, मानसीक व शारिरीक पिळवणूक करत आला आहे. काही दिवसांपूर्वी त्याच्या वर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला असून तो या प्रकरणी जामिनावर आहे.
या कॉलेजमध्ये आवश्यक शिक्षक स्टाफ, लॅब, प्रात्यक्षिक सुविधा अजीबात उपलब्ध नाही त्यामुळे येथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यापीठ नियमानुसार कोणतेही योग्य प्रशिक्षण व शिक्षण मिळतं नसून गैर मार्गाचा वापर करून फक्त पास करून देण्याची हमी दिली जाते व त्या मोबदल्यात आर्थिक व्यवहार केले जातात. जे विद्यार्थी पूर्ण प्रशिक्षण व शिक्षणाचा आग्रह धरतील व त्याच्या गैर मार्गात सहभागी होण्यास नकार देतील त्यांना दम देणे, मुलींना कॅबिनमध्ये बोलावून घेऊन मानसीक व शारिरीक छळ करणे असे प्रकार खुद्द संस्थापक अध्यक्ष डॉ भास्कर मोरे यांच्याकडून केले जात असल्याचे गंभीर आरोप त्यांच्यावर होत आहेत. या कॉलेजमध्ये मुली अजीबात सुरक्षीत नाहीत ही गंभीर परिस्थिती आहे.
याबाबत संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष आण्णासाहेब सावंत यांनी आपल्या खालील मागण्यांमध्ये म्हंटले आहे की
१) या संस्थेस ज्या विद्यापीठांनी वरील अभ्यासक्रम चालविण्यास परवानगी दिली त्या विद्यापीठाचे पथक प्रत्यक्ष येऊन विद्यार्थी, तहसीलदार, पोलिस निरीक्षक, सामाजिक कार्यकर्ते याच्या समक्ष वरील सर्व गोष्टींची शहानिशा करून सत्य पडताळणी करण्यात यावी यासाठी सवित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे व आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांना तातडीचा पत्रव्यवहार करून पथक निमंत्रित करावे .
२) या कॉलेजमध्ये मुली अजीबात सुरक्षीत नाहीत म्हणून मा.तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांनी तातडीने याची तक्रार राष्ट्रीय महीला आयोगाकडे व राज्य महीला आयोगाकडे करून त्यांना निमंत्रित करून सखोल चौकशी करावी. तसेच सक्षम महीला पोलिस अधिकारी निमंत्रीत करून मुलींच्या मानसिक शारीरिक शोषणाची सखोल चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी.
३) डॉ भास्कर मोरे हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून त्याच्याकडे परवाना शस्त्र आहे अशी माहिती मिळाली आहे तसे असेल तर त्याचा परवाना रद्द करून, शत्र जप्त करण्यात यावे आशा मागण्यांसाठी विद्यार्थींच्या आमरण उपोषणास पाठिंबा देऊन त्यामध्ये संभाजी ब्रिगेड सहभागी असेल याची प्रशासनाने नोंद घ्यावी. या संदर्भात कोणतीही तात्काळ कारवाई सुरू झाली नाही तर सर्व समाज घटकांना बरोबर घेऊन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असे देखील निवेदनात म्हटले आहे.
No comments:
Post a Comment