पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-१६ मार्च
रत्नदीप मेडिकल कॉलेजचे अध्यक्ष भास्कर मोरे विरोधात विद्यार्थ्यांनी आंदोलन व शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानाचे पांडुरंग भोसले यांनी अकरा दिवस आंदोलन केले होते . त्या दरम्यान विनयभंगाच्या गुन्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेने दि. १३ मार्च रोजी त्यास जामखेड न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती . व पोलीस कस्टडी संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी न्यायालयीन कोठडी सुनावली. मात्र त्याचवेळी वन विभागाने भास्कर मोरेला हरीण पाळल्या प्रकरणी ताब्यात घेतले होते. त्यानुसार आज दि. १६ मार्च रोजी न्यायालयात हजर करण्यात आले यावेळी त्याला चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार वनविभागाने दि.१० मार्च रोजी रत्नदीप मेडिकल कॉलेजच्या परिसरात तपासणी केली होती. त्यानुसार वनविभागाने भास्कर मोरे विरोधात वन्य जीव संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल केला होता. यावेळी सहाय्यक वन संरक्षक राहुरी गणेश मिसाळ, मोहन शेळके वनपरिक्षेत्र अधिकारी कर्जत जामखेड, रवि राठोड, शांतिनाथ सपकाळ, नागेश तेलंग ,दक्षता पथक बडे डी. एम., बी. एस.भगत, ताहेभाई सय्यद, एस.पी. डोंगरे, एस.व्ही.चिलगर, एन.एन.नेहरकर, आर.एस. सुरवसे, एस.के. सूर्यवंशी व एच.के. माळ शिकारी या पथकाने सदर कारवाई केली होती.
तसेच वनविभागाला अनेक तक्रारी दाखल झाल्या होत्या काही हरीण मारून पुरले आहे अशी तक्रार होती तेव्हा जेसीबीच्या साह्याने अनेक ठिकाणी शोध कार्य सुरू होते यावेळी काही प्राण्यांचे केस व एक हाड आढळून आले होते तपासणीसाठी नागपूर फॉरेन्सिक लॅबकडे पाठवले आहे. तसेच काल ही काही प्राण्यांचे शिंगे आढळून आले होते.त्यानुसारही तपासणी सुरू आहे. तसेच वन्य जीव संरक्षण कायद्याखाली भास्कर मोरे विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे.जर तपासणीमध्ये हाड व शिंगे कशाचे निघतात यानुसार परत भास्कर मोरेच्या अडचणीत आणखीन वाढ होण्याचे दिसून येत आहे.
No comments:
Post a Comment