पोलीस वारंट न्यूज नेटवर्क/ 23 एप्रिल
पुरोगामी विचारांचा वारसा जपणारे नेतृत्व म्हणून शरद पवारांनी राज्य व देशात राजकारण केले. बारामतीच्या माळरानावर विकासाचे वेग-वेगळे प्रकल्प आणण्याचे काम पवार साहेबांनी केले.अश्यातच पवार साहेबांना बारामतीच्या प्रचारात अडकवून ठेवायचे असा विचार करणाऱ्यांनी आता रोहित पवारांच्या प्रचारसमोर गुढगे टेकल्याचे दिसून येत आहे. आमदार रोहित पवार हे बारामती मतदारसंघात मिनिट to मिनिट प्रचार करत आहेत. रोहित पवार प्रचार रॅली, कॉर्नर बैठका, जुण्या जाणत्या नेत्यांच्या भेटी अशा पद्धतीने मतदार संघात फिरत आहेत...
रोहित पवार यांनी निवडणूक लागल्यापासून आत्तापर्यंत प्रत्येक विधानसभा मतदारसंघानिहाय दौरा केला आहे. इंदापूर, दौंड, खडकवासला, पुरंदर या ४ मतदार संघात अधिक ताकतीने ते प्रचार करत आहेत. बारामती तालुक्यात प्रत्येक जिल्हा परिषद गटात नागरिकांच्या सोबत संवाद साधत त्यांच्या अडचणी समजून घेत आहेत.
बारामती मतदार संघात अजित पवार यांनी शरद पवारांची साथ सोडल्यानंतर रोहित पवार निकराने लढताना पाहायला मिळतात या उलट अजित पवारांचे दोन्ही पुत्र पार्थ व जय हे मात्र तितकासा प्रचार करताना पाहायला मिळत नाहीत. रोहित पवार आपले बंधू युगेंद्र पवार यांना सोबत घेऊन प्रचार करत असल्याचे देखील काही ठिकाणी पाहायला मिळाले परिणामी पवार कुटुंबात तिसरी पिढी अजित पवारांच्या राजकीय वर्चस्वाला धक्का देण्याच्या प्रयत्नात असल्याचे देखील दिसत आहे.
बारामती मतदार संघावर सध्या देशाचं लक्ष आहे परिणामी रोहित पवार माध्यमांच्या केंद्रास्थानी असल्याचे देखील दिसून येत आहे. रोहित पवार आपल्या खास भाषण शैली साठी प्रसिद्ध आहेत. युवा वर्गांच्या मागण्या सातत्याने आपल्या भाषणातून मांडत असल्याने त्यांना युवकांचा मोठा पाठिंबा देखील मिळत आहे. अश्यात ते भाजपाच्या प्रचार यंत्रणेवर जड होत असल्याचे दिसून येत आहे.
No comments:
Post a Comment