पोलीस वारंट न्यूज नेटवर्क/२८ एप्रिल
जामखेड तालुक्यातील खर्डा येथील कानिफनाथ मंदिराच्या पाठीमागे गीते वाडी रस्त्याला दि. २५ एप्रिल रोजी दुपारी एक ते दीड चे सुमारास भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने मोटारसायकल स्वारास जोराची धडक दिल्याने मोटरसायकल वरील सनी परशराम रणशिंग या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. अपघात ग्रस्त तरुणास मदत करण्याऐवजी चालक आपल्या वाहनासह पसार झाला. त्यामुळे तरुणाला उडवून निघून गेल्याले वाहन सापडण्याचे पोलीसांसमोर आव्हान निर्माण झाले. कोणताही ठोस पुरावा नसताना अज्ञात वाहन सुसाट वेगाने पैठण पंढरपूर राज्य महामार्गावरून वेगाने गेले असल्याचा एवढाच धागा पोलिसांच्या हाती होता. एवढ्याच माहितीच्या आधारे खर्डा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झंजाड यांनी तातडीने सूत्रे हलवून. त्यानुसार आपल्या पोलीस पथकाला योग्य ते मार्गदर्शन व सुचना देऊन या अज्ञात वाहनाच्या तपासासाठी रवाना केले. त्यानुसार खर्डा पोलीस स्टेशनचे पोलीस हेड कॉन्स्टबल संभाजी शेंडे, शशी म्हस्के, बाळू खाडे, अशोक बडे यांनी निघून गेलेल्या वाहणाचा तात्काळ तपास करून वाहन ताब्यात घेतले आहे. व पिकअप क्रमांक MH-17-AG-8942 हे रात्री उशिरा खर्डा पोलीस ठाण्यात आणली आहे. या अपघातील मोटरसायकलचा क्र. MH 14 AC 3539 असा आहे. तर सनी परसराम रणसिंग वय २२ वर्षे रा. आपटी, ता. जामखेड असे अपघातातील मयत तरूणाचे नाव आहे. या गुन्ह्यातील आरोपीवर खर्डा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आला आहे.
या घटनेबाबत फिर्यादी सुग्रीव विश्वनाथ मोरे वय ४० वर्ष रा. तेलंगशी ता. जामखेड यांनी दि. २६ रोजी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी विरुद्ध मोटार वाहन कायदा 1988 चे कलम 134 (अ) (ब) 187 प्रमाणे तसेच भा. द.वी. कलम 304, (अ) 279,427 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृताच्या नातेवाईकांनी खर्डा पोलीस स्टेशनला मोठी गर्दी केली होती. सनी हा तुळजापूर येरमाळा यात्रेनिमित्त गावाकडे आला होता. देवदर्शन करून तो आपटी या गावावरून आपल्या मामाच्या गावाकडे बहिणीला भेटण्यासाठी दिघोळ या गावी चालला होता. सोबत देवदर्शनाहून आणलेला प्रसाद घेऊन जात असताना खर्डा परिसरातील कानिफनाथ टेकडी जवळ त्याचा दुर्दैवी अपघात होऊन मृत्यू झाला. तो अविवाहित असून एका गरीब कुटुंबातील कर्ता मुलगा मयत झाल्याने रणसिंग कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
No comments:
Post a Comment