पोलीस वारंट न्यूज नेटवर्क/२६ मे
पुणे, नागपुर सह राज्यातील अनेक शहरातील हिट अँड रनची प्रकरणे समोर येत असताना याचे लोन आता ग्रामीण भागातही पसरत आहे. काल दि. २५ मे सायंकाळी साडेसहा वाजतचे सुमारास जामखेड- खुरदैठण जाणारे रोडवर एक भरधाव पिकअपने एका पॅगो रिक्षाला समोरून जोरदार धडक दिल्याने रिक्षा चालकासह पाचजण गंभीर जखमी झालेचा प्रकार घडला असून सुदैवाने यात जिवितहानी झाली नाही. यातील जखमींवर जामखेड शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून आरोपी पिकअप चालकास अटक करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर असे की, काल दि. २५ मे रोजी रोजी सायंकाळी ६: ३० वाजताचे सुमारास जामखेड ते खुरदैठण जाणारे रोडवर साई हॉटेल पाडळी फाटा जवळ ता. जामखेड यातील पिकअप गाडी नंबर MH-16-AY-7382 चालक युवराज अशोक खैरे, गुरेवाडी ता. जामखेड मजकुर याने त्याचे ताब्यातील वरील वर्णनाचे पिकअप गाडी हयगयीने अविधाराने रस्त्याचे परीस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगात चालवून पॅगो रिक्षा होस समोरून जोराची धडक देऊन चालक व साक्षीदार याचे कमी व गंभीर दुखापतीस व पॅगो गाडीचे नुकसानीस कारणीभुत झाला आहे. यानुसार फिर्यादी संतोष गोरख डुचे (वय ४५) रिक्षाचालक ता. जामखेड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा रजि. नंबर 282/2024 भादवि कलम 279,337, 338, 427 सह मो.का.कालम 184,185 प्रमाणे गुन्हा रजिष्टरी दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्टेबल अजय साठे हे करत आहेत.
या अपघातात चेतन पंडीत ठाकरे, संतोष गोरख डुचे, बाळासाहेब बापू गाडे, हनुमंत सुर्यवंशी, अतुल विनायक खवळे सर्व रा. जामखेड ता. जामखेड हे पाच जण या अपघातात जखमी झाले असून त्यांचेवर जामखेड शहरातील खाजगी हाॅस्पिटल मध्ये उपचार सुरू आहेत .
No comments:
Post a Comment