पोलीस वारंट न्यूज नेटवर्क/३०मे
अपघातातील जखमींच्या दवाखान्याचे बील देण्याच्या कारणावरून झालेल्या वादामुळे जामखेड येथील व्यापाऱ्यास मारहाण करण्यात आली होती. या प्रकरणी एक जणांसह इतर सहा अनोळखी अशा एकूण सात जणांविरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी व्यापाऱ्यांनी आरोपींना तात्काळ अटक करून कडक कारवाई करण्यासाठी तहसीलदार व पोलीस स्टेशनला निवेदन दिले आहे व व्यापाऱ्यांच्या वतीने या घटनेचा निषेध करण्यात आला.
याबाबत अधिक माहिती अशी की, जामखेड येथील व्यापारी नितीन बाफना यांच्या मालकीच्या पीक अप गाडीचा त्यांच्या चालकांकडून सहा दिवसांपूर्वी अपघात घडला होता. या अपघातात पीकअप गाडीने रिक्षा ला धडक दिली होती. यात एकुण पाच जण जखमी झाले होते. यातील काही जखमींवर जामखेड येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या जखमींच्या बीलाचा खर्च जखमीचे नातलग हे व्यापारी नितीन बाफना यांना मागत होते.
बुधवार दि. २९ रोजी दुपारी व्यापारी नितीन बाफना हे आपल्या दुकानात बसले होते. यावेळी त्या ठिकाणी सुरज राऊत (पुर्ण नाव माहिती नाही) त्याच्या सोबत इतर सहा जण अनोळखी होते. यावेळी बीलांच्या कारणावरून फिर्यादी व आरोपी मध्ये भांडणे सुरू झाली. तुम्ही दवाखान्याचा व औषध उपचाराचा खर्च का दिला नाही असे म्हणत पैसे मोजण्याचे मशीन, पीव्हीसी पिईपचे दरवाजा बंद करण्याची लोखंडी प्लेट व पाईपने मारहाण करत व्यापारी नितीन बाफना यांना जखमी केली. या झटपटीत फिर्यादी यांच्या गळ्यातील सहा तोळ्याची सोन्याची चैन गहाळ झाली.
या प्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला व्यापारी नितीन बाफना यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरील आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष कोपनर करत आहेत.
मारहाण प्रकरणी व्यापाऱ्यांच्या वतीने केला घटनेचा निषेध
व्यापाऱ्यास झालेल्या मारहाणीच्या घटनेचा व्हिडिओ शहरात पसरताच आज गुरूवार दि. ३० रोजी व्यापारी व नागरीकांच्या वतीने सकाळी नऊ ते अकरा वाजेपर्यंत आपली दुकाने बंद ठेवून घटनेचा निषेध केला. तसेच तहसीलदार गणेश माळी व पोलीस निरीक्षक महेश पाटील यांना निवेदन देऊन तातडीने आरोपींना अटक करावी व कडक कारवाई करावी अशी मागणी केली आहे. निवेदन देता वेळी शहरातील सर्व व्यापारी व नागरीक उपस्थीत होते.
No comments:
Post a Comment