पोलीस वारंट न्यूज नेटवर्क/२८ मे
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती महोत्सव वर्षाला येत्या ३१ मे पासून सुरुवात होणार आहे.
त्यांचे जन्मस्थळ असलेले चौंडी (ता. जामखेड) गाव राष्ट्रीय स्मारक होण्यासाठी प्रयत्नशील आहे. परंतु २०२२ च्या जयंती महोत्सवाच्या पत्रिकेत माझे नाव नव्हते. मला बोलावलेही नाही. माझ्या घरात मला स्थानबद्ध केले होते. पण आम्ही आमदार रोहित पवार यांचे निमंत्रण पत्रिकेत नाव टाकले", अशी प्रतिक्रिया भाजप आमदार प्रा. राम शिंदे यांनी दिली.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९९ व्या जयंतीनिमित्त येत्या ३१ मे रोजी चौंडी येथे विविध कार्यक्रम होणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार , केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले , पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ज्येष्ठ नेत्या पंकजा मुंडे, महादेव जानकर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती अहिल्यादेवी होळकर जयंती महोत्सव समितीचे प्रमुख भाजप आमदार प्रा. राम शिंदे यांनी येथे दिली.
आमदार शिंदे म्हणाले, "चौंडी हे माझे गाव आहे. अहिल्यादेवींचे माहेर असलेल्या शिंदे परिवाराचा मी घटक आहे. दोन वेळा गावचा सरपंच, दोन वेळा आमदार व जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी काम केले आहे. मात्र, 2022 च्या जयंती महोत्सवाच्या पत्रिकेत माझे नाव नव्हते. मला बोलावलेही नाही. माझ्या घरात मला स्थानबद्ध केले होते. त्यावेळी 31 मे 2022 चा जयंती महोत्सव मी घरात केला".
अहिल्यादेवींची माझ्यावर कृपा असल्याने लगेच ७ जून २०२२ ला राज्याच्या वरिष्ठ सभागृहात पोहोचण्यासाठी मला तिकीट मिळाले व वीस दिवसात मी आमदारही झालो. मात्र, आम्ही जयंती महोत्सवाच्या निमंत्रण पत्रिकेत कोणाचेही नाव टाळले नाही. रोहित पवार यांचे नाव आम्ही टाकले, असे सूचक भाष्यही आमदार शिंदे यांनी केले
No comments:
Post a Comment